AmazonFab Phones Fest Sale: अॅमेझॉनवर सध्या सुरु असलेला फॅब फोन्स फेस्टचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या सेलमधील जबरदस्त ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी फक्त काहीच तास शिल्लक राहिले आहेत. या सेलमध्ये अॅप्पल, सॅमसंग, शाओमी सारख्या दिग्गज ब्रँड्सचे फोन स्वस्तात मिळत आहेत. तसेच रेडमी, रियलमी सारख्या बजेट फ्रेंडली डिवाइसेजवर देखील डिस्काउंट मिळत आहे. असाच एक Redmi चा 5G स्मार्टफोन सेलमध्ये फक्त 249 रुपयांमध्ये विकला जात आहे.
जबरदस्त ऑफर
Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात 16,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु अॅमेझॉन सेलमध्ये याची विक्री 13,999 रुपयांमध्ये केली जात आहे. सोबत कुपन डिस्काउंटचा वापर करून 500 रुपयांची सूट मिळेल. त्यामुळे हा फोनची किंमत 13,499 रुपये होईल. आणखीन बचत करण्यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा वापर करावा लागेल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 13,250 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. म्हणजे या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास Redmi Note 10T 5G स्मार्टफोन फक्त 249 रुपयांमध्ये तुमचा होईल.
Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10टी 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या रेडमी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरसह Mali-G57 GPU देण्यात आला आहे. अँड्रॉइड 11 आधारित MIUI वर चालणारा हा फोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.
5जी कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देखील मिळतो. Redmi Note 10T 5G मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळते, ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. एकदा चार्ज केल्यावर हा फोन दोन दिवस चालेल, असा कंपनीने दावा केला आहे.
हे देखील वाचा: