Apple ने नुकतेच आपला VR हेडसेट Apple Vision Pro लाँच केला आहे. Apple Vision Pro लॉन्च होताच चर्चेचा विषय बनला आहे. येणाऱ्या काळात घराघरांतील स्मार्ट टीव्ही संपुष्टात येऊ शकतात. कारण स्मार्ट टीव्हींची जागा ऑग्मेंटेड रिअॅलिटी हेडसेट घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
असाच एक व्हीआर हेडसेट अॅपलने लॉन्च केला आहे. हा हेडसेट टेक्नोलॉजीचे विश्व कशा पद्धतीने बदलेल, याची झलक अॅपलच्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स काँफ्रन्समध्ये बघायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांच्याकडून एक ट्विट करण्यात आले आहे. हे पाहता पाहता जबरदस्त व्हायरल झाले.
टिम कुक यांच्या ट्विटवर आनंद महिंद्रांनी दिला रिप्लाय - अॅपलचे CEO टिम कुक ट्विटद्वारे अॅपल व्हिजनची माहिती शेअर करताना म्हणाले, अशा प्रकारचे डिव्हाईस आपण यापूर्वी पाहिले नसेल. ही कंप्यूटिंग जगातातील नव्या युगाची सुरुवात आहे. अॅपल सीईओ यांच्या ट्विटला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले, "हा मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीच्या डिस्प्लेच्या डेथचा सिग्नल आहे? त्यांनी प्रश्न केला की, दिग्गज स्मार्ट टीव्ही ब्रँड सोनी आणि सॅमसंग यासंदर्भात काय तयारी करत आहेत? त्यांनी स्मार्ट टीव्हीवरील मूव्ही आणि स्पोर्टस पाहण्यासंदर्भातही प्रश्न केला, की आता खोलीत हेडसेट लावून झॉम्बी पाहणार?"
काय आहे अॅपल व्हिजन प्रो -अॅपल व्हिजन प्रोची किंमत जवळपास 2.80 लाख रुपये आहे. हे पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजाराज येऊ शकते. अॅपल व्हिजन प्रोचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेयर अपडेटसाठी अॅपलकडून मीरा स्टार्टअप सोबत करार करण्यात आला आहे. जे व्हीआर हेडसेट तयार करण्याचे काम करते.