शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

चोरी झालेला Android Phone लगेच मिळणार, स्विच ऑफ झाल्यावरही कळणार लाइव्ह लोकेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 1:13 PM

स्मार्टफोनचा वापर वेगानं वाढतो आहे. स्मार्टफोन विना आपली अनेक कामं रखडून पडतात. पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा आपला फोन हरवतो किंवा तो चोरीला जातो.

नवी दिल्ली-

स्मार्टफोनचा वापर वेगानं वाढतो आहे. स्मार्टफोन विना आपली अनेक कामं रखडून पडतात. पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा आपला फोन हरवतो किंवा तो चोरीला जातो. पण आता तुम्ही तुमचा चोरीला गेलेला फोन अगदी सहजपणे ट्रॅक करू शकणार आहात. फोन स्विच ऑफ झाला की ट्रॅक करणं अवघड असतं. पण आता फोन स्विच ऑफ झाल्यानंतरही तो ट्रॅक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला एक अँड्रॉइड अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे. 

फोन स्विच ऑफ असेल तरी त्याचं लोकेशन कसं शोधायचं हेच आपण आता जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुमचा फोन चोरीला गेला असेल तर सर्वात आधी पोलीस ठाण्यात त्याची तक्रार नोंदवणं सगळ्यात महत्वाचं आहे. पोलिसांनाही तुम्ही तुमचा फोन ट्रॅक करण्याची विनंती करू शकता. बहुतांश प्रकरणांमध्ये पोलीस फोन ट्रॅक करतात आणि योग्य मालकाकडे तो सुपूर्द देखील करतात. पण काही सेफ्टी ट्रिक्सचा वापर करुन तुम्ही तुमचा फोन सहजपणे ट्रॅक करू शकता. 

गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत अ‍ॅप्सTrack it EVEN if it is off हे अँड्रॉइड यूझर्ससाठीचं अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करू शकता. याचं रेटिंग देखील चांगलं आहे. हे अ‍ॅप Hammer Security नं विकसीत केलं आहे. याचा सेटअप प्रोसेस देखील अतिशय सोपा आहे. अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर ते ओपन करुन काही परमिशन्स द्याव्या लागतील. यात एक फिचर डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोडचं आहे. यात फोन स्विच ऑफ केल्यानंतरही तो पूर्णपणे बंद होत नाही. पण चोराला वाटेल की तो फोन बंद झाला आहे. 

लोकेशनची माहिती मिळणार तुमच्या डिव्हाइसची संपूर्ण माहिती आणि अ‍ॅक्टीव्हीटी जसं की लोकेशन, ज्याच्या हातात फोन आहे त्याचा सेल्फी आणि इतर माहिती तातडीनं यूझरच्या आपत्कालीन क्रमांकावर पाठवली जाते. तसंच हे अ‍ॅप फोनचं लाइव्ह लोकेशन देखील युझरला दाखवतं. फोन ट्रॅक करणं अतिशय सोपं झालं आहे. जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी हे अतिशय उपयोगी अॅप आहे. यात गुगल प्ले स्टोअरला चांगली रेटिंगही मिळाली आहे. फोन चोरी झाल्यास याचा चांगला उपयोग होऊ शकतो. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन