भारतात Android युजर्सची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. सॅमसंग ते विवोपर्यंत अनेक जण Android ऑपरेटिंग सिस्टम (Android OS) वापरून त्यांचे हँडसेट तयार करतात. आता अशा कोट्यवधी स्मार्टफोन युजर्सना मोठा धोका आहे. सिक्योरिटी एक्सपर्ट एका नवीन प्रकारच्या मालवेअरबद्दल सांगितलं आहे, Android XLoader असं त्याचं नाव आहे.
हा मालवेअर स्मार्टफोनमधील महत्त्वाच्या तपशीलांपर्यंत पोहोचतो. हा एसएमएसमध्ये देखील प्रवेश करतो आणि बॅकग्राईंडला काम करते. रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोन युजर्ससाठी हे अत्यंत धोकादायक सिद्ध होऊ शकतं. ब्लीपिंग कॉम्प्युटरने या McAfee च्या हवाल्याने हे रिपोर्ट्स दिले आहेत.
Android XLoader मालवेअर कसा करतो अटॅक?
Android XLoader मालवेअर अतिशय सहजपणे डिव्हाइसवर अटॅक करू शकतो. यामध्ये, एक मेसेज इन्फेक्टेड वेबसाईट URL सह येतो. हा मेसेज फोनमध्ये Malicious App मार्ग खुला करतो. दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर, एपीके फाइल हँडसेटमध्ये इन्स्टॉल होते. मेसेजमध्ये येणाऱ्या लिंकवर क्लिक करताच ते काम करायला लागतं.
या लिंक Sideloading टेक्निकचा वापर करून दुसऱ्या सोर्सकडून एप इन्स्टॉल करतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोबाईल युजर्सनाही याची माहिती नसते. हा मालवेअर केवळ एसएमएसमध्येच प्रवेश करत नाही, तर एप्सनाही ट्रॅक करू शकतो. या टूल्सचा वापर करून हॅकर्स तुम्हाला लक्ष्य करू शकतात.
McAfee ने आधीच गुगलला या लेटेस्ट थ्रेडची माहिती दिली आहे. यानंतर कंपनीने हा मालवेअर रिमूव्ह केला. प्ले स्टोअरच्या बाहेर उपलब्ध असलेल्या एप्सना Google कंट्रोल करू शकत नाही. Google तुमचे डिव्हाइस संरक्षित करण्यासाठी Play Protect इनेबल करण्याची शिफारस करतं. हे अनेक धोक्यांपासून तुमचं रक्षण करण्याचं काम करतं.