Joker Malware अँड्रॉइड अॅप्समध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. या व्हायरसने बाधित अॅप्सची यादी प्रत्येक महिन्याला समोर येत आहे. आता देखील Google ने 7 अॅप्समध्ये हा मालवेयर आढळल्यामुळे हे अॅप्स प्ले स्टोरवरून बॅन केले आहेत. जरी प्ले स्टोरवरून हे बॅन झाले असले तरी ज्या अँड्रॉइड डिवाइसेसमध्ये हे आधीपासून इन्स्टॉल आहेत त्यांच्यासाठी धोका अजून टाळला नाही. तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये जर हे अॅप्स असतील तर त्वरित ते डिलीट करून टाका.
Joker Malware In Android Apps
जोकर मालवेयरची माहिती प्रसिद्ध अँटीव्हायरस फर्म Kaspersky ने दिली आहे. अॅनॅलिस्ट तात्याना शिश्कोवा यांनी सांगितले कि, 7 अॅप जोकर या ट्रोजन मालवेयरने प्रभावित आहेत. हा मालवेयर युजर्सच्या न कळत त्यांना प्रीमियम सर्व्हिसेसना सब्सक्राइब करतो. त्यामुळे युजर्सचे बँक अकाउंट रिकामे होत असते परंतु त्याची खबर त्यांना लागत नाही.
त्यामुळे एकदा युजर्सना फक्त हे अॅप्स अनइन्स्टॉल करण्याचा सल्ला दिला जात नाही तर, नकळत घेतलेल्या पेड सर्व्हिसेस शोधून त्या बंद करणे आवश्यक आहे. पुढ़े आम्ही या अॅप्सची यादी दिली आहे. या सात अॅप पैकी एखाद्या अॅपचा वापर तुम्ही करत असाल तर ते त्वरित काढून टाका.
Joker Virus असलेले 7 अँड्रॉइड अॅप्स:
- Now QRcode Scan (10,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल)
- EmojiOne Keyboard (50,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल)
- Battery Charging Animations Battery Wallpaper (1,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल)
- Dazzling Keyboard (10 पेक्षा जास्त इन्स्टॉल)
- Volume Booster Louder Sound Equalizer (100 पेक्षा जास्त इन्स्टॉल)
- Super Hero-Effect (5,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल)
- Classic Emoji Keyboard (5,000 पेक्षा जास्त इन्स्टॉल)