Apple आपल्या प्रीमियम क्वॉलिटी फोन्ससाठी ओळखली जाते. कंपनीचे महागड्या फोन्सना डिजाईन आणि सिक्योरिटीच्या बाबतीत आव्हान देणारे खूप कमी स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. या फोन्समधील प्रोसेसिंग आणि रॅम मॅनेजमेंटमुळे आयफोन्स हँग होण्याची समस्या खूप कमी वेळा समोर येते. परंतु आता ग्राहकांनी नवीन आयफोन मॉडेल्स विकत घ्यावे म्हणून Apple मुद्दामहून आपले जुने iPhones मॉडेल्स स्लो करत असल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. (Apple Accused of Slowing Down iPhone Handsets After iOS Updates)
स्पेनमधील ग्राहक सुरक्षा संघटना (OSU) ने Apple वर हा गंभीर आरोप केला आहे. अमेरिकन कंपनी अॅप्पलने आयफोन्सच्या जुन्या मॉडेल्सवर असे अपडेट्स पाठवले आहेत, जे फोनमध्ये डाउनलोड करताच युजर्सचे आयफोन मंद होतात, असे संघटनेने म्हटले आहे. ग्राहकांनी नवीन आयफोन मॉडेल्स विकत घ्यावे म्हणून कंपनी जुन्या फोन्सची प्रोसेसिंग स्लो करत आहे, तसेच ही अॅप्पलने विचारपूर्वक आखलेली रणनीती असल्याचा संघटनेने दावा केला आहे. याबाबत कंपनीला पत्र पाठवून संघटनेने उत्तर मागवले आहे.
स्पॅनिश संघटनाच्या मते, Apple ने iOS 14.5, iOS 14.5.1 आणि iOS 14.6 अपडेटनंतर iPhones प्रोसेसिंग स्पीड, अॅप ओपनिंग आणि टच रिस्पांस देखील खूप स्लो झाला.तसेच आयओएस अपडेटनंतर iPhone ची बॅटरी वेगाने ड्रेन होऊ लागली. रिपोर्टनुसार नवीन अपडेटनंतर iPhone 8 आणि iPhone XS सोबतच iPhone 11 आणि नवीन iPhone 12 मध्ये देखील ही समस्या आढळली आहे. सध्यातरी अॅप्पलने याविषयी कोणतेही विधान केले नाही. परंतु हा आरोप खरा ठरल्यास लाखो आयफोन युजर्सच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो.