Apple iPhone 15 ची वाट पाहिली जात आहे. गेल्या काही सिरीजपासून आयफोनमध्ये फारसे काही वेगळे लोकांना मिळत नाहीय. यामुळे फक्त स्टेटस म्हणून आणि हौस म्हणून लोक गेल्या काही सिरीज घेत आहेत. यामुळे आतातरी अॅपल काही वेगळे करतेय का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच अॅपलची नवी आयफोन सिरीज कधी येतेय, याची तारीख जवळपास निश्चित झाली आहे.
iPhones 15 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत. तर २२ सप्टेंबरपासून ते विक्रीसाठी उपलब्ध होतील. 9to5Mac च्या वृत्तानुसार 13 सप्टेंबरला अॅपल नव्या स्मार्टफोनसह अन्य उपकरणांचा लाँच इव्हेंट करणार आहे. यासाठी अनेकांच्या सुट्ट्या नाकारण्यात आल्या आहेत.
अॅपल कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी मीडियाला निमंत्रण पाठविते. यावेळी Apple Watch Series 9, Apple Watch Ultra 2 व iOS 17 फायनल लाँच असणार आहे. तसेच Apple iPhone 15 मध्ये चार वेगवेगळ्या स्पेसिफिकेशनचे स्मार्टफोन आसणार आहेत. यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max आणले जाण्याची शक्यता आहे.
MacRumours च्या मते, iPhone 15 आणि iPhone 15 Plus ची किंमत पूर्वीप्रमाणेच सुमारे $799 आणि $899 असेल. iPhone 15 Pro ची किंमत $1,099 पर्यंत असू शकते आणि मोठ्या iPhone 15 Pro Max ची किंमत $1,299 पर्यंत असू शकते.