शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
6
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
7
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
8
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
9
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
10
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
13
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
14
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
15
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
16
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
17
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
18
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
19
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
20
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!

Steve Jobs यांनी 14,000 रुपयांच्या चेकवर केली होती स्वाक्षरी, लिलावात इतक्या लाखांना झाली विक्री; पाहून वाटेल आश्चर्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 11:25 AM

लिलावाच्या यादीनुसार, चेकवर 1976 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती, जेव्हा अॅपलची स्थापना झाली होती.

अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांना ऑटोग्राफवर स्वाक्षरी करण्याची आवड नव्हती. पण, त्यांनी एका चेकवर स्वाक्षरी करताना 'ऑटोग्राफ' दिला होता. स्टीव्ह जॉब्स हयात असताना त्यांनी 175 (सुमारे 14,000 रुपये) डॉलरच्या चेकवर स्वाक्षरी केली होती. हा चेक कंपनीने लिलावासाठी देऊ केला होता. लिलावाच्या यादीनुसार, चेकवर 1976 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती, जेव्हा अॅपलची स्थापना झाली होती.

चेकवर स्वाक्षरी क्रॅम्प्टन, रेमके अँड मिलर या आता बंद पडलेल्या पालो अल्टो व्यवस्थापन सल्लागार कंपनीसाठी करण्यात आली होती, ज्यांच्या क्लायंटमध्ये अटारी, झेरॉक्स आणि इतर टेक्नॉलॉजी कंपन्यांचा समावेश होता. "क्रॅम्पटन, रेमके अँड मिलर पालो ऑल्टोमधील व्यवस्थापन सल्लागार कंपनी होती. जी उत्तर कॅलिफोर्नियामधील हाय-टेक कंपन्यांच्या विस्तृत सिरिजसाठी व्यवसाय प्रक्रिया सल्लामसलत पुरवत होती. नवीन Apple Computer व्यतिरिक्त, फर्मच्या क्लायंटमध्ये अटारी, मेमोरेक्स, नॅशनल सेमीकंडक्टर आणि झेरॉक्सचा यांचा समावेश होता. वेबसाईटनुसार, चेक मूळ स्थितीत होता.

स्टीव्ह जॉब्स हे ऑटोग्राफवर स्वाक्षरी करण्यास अत्यंत अनिच्छुक होते, ज्यामुळे त्यांनी स्वाक्षरी केलेल्या वस्तू अधिक मौल्यवान बनतात. आरआर ऑक्शन जे लिलाव घर म्हणून ओळखले जाते. त्यांनी सुरुवातीला चेक 25,000 डॉलरला विक्री होण्याची शक्यता होती. जे चेकच्या दर्शनी मूल्याच्या 142 पट आहे. मात्र, लिलाव संपण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, शीर्ष बोलीने त्या अंदाजाला मागे टाकले, सध्याची किंमत 29,995 डॉलर आहे, जी चेकच्या मूल्याच्या 171 पट आहे. चेकमध्ये अॅपलचा पत्ता लिहिलेला आहे, जो त्यावेळी स्टीव्ह जॉब्स गॅरेजमध्ये काम करत होते. हे डिटेल्स अॅपलच्या उत्साही आणि संग्राहकांसाठी आर्टिफॅक्टचे ऐतिहासिक महत्त्व वाढवते. स्टीव्ह जॉब्स यांनी स्वाक्षरी केलेल्या चेकच्या लिलावावरून असे दिसून येते की लोकांना अॅपलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आणि ज्यांनी ते सुरू केले, त्या लोकांमध्ये अजूनही खूप आवड आहे. हे देखील सिद्ध होते की लोक त्या इतिहासाच्या एका तुकड्याच्या मालकीसाठी खूप पैसे मोजण्यास तयार आहेत.

टॅग्स :Steve Jobsस्टीव्ह जॉब्सtechnologyतंत्रज्ञान