शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Apple Event 2020 : अवघ्या 15 सेकंदांत रक्तातील ऑक्सिजन मोजणार, दमदार फीचर्ससह Apple Watch 6 लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 8:16 AM

Apple Event 2020 : कोरोना काळातील आरोग्याचा विचार करता कंपनीनं स्मार्टवॉचच्या सहाव्या सीरिजमध्ये रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजणारं फीचर दिलं आहे.

अ‍ॅपलने आपल्या नव्या उत्पादनांची सीरिज लाँच केली आहे. आयपॅड, आयपॅड एअर, अ‍ॅपल वॉच या उत्पादनांचा त्यामध्ये समावेश आहे. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी व्हर्चुअल कार्यक्रमाच्या माध्यमातून ही उत्पादने लाँच केली आहेत. कोरोना संकट असल्याने हा संपूर्ण सोहळा ऑनलाईन संपन्न झाला आहे. अ‍ॅपलने दोन नवीन अ‍ॅपल वॉच लाँच केले आहेत. अ‍ॅपलकडून स्मार्टवॉचची सहावी सीरिज (Apple Watch 6 Series) लाँच करण्यात आली आहे. 

कोरोना काळातील आरोग्याचा विचार करता कंपनीनं स्मार्टवॉचच्या सहाव्या सीरिजमध्ये रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजणारं फीचर दिलं आहे. यासोबतच ईसीजी, हार्ट रेट आणि अन्य सेन्सर देखील असणार असून ते अ‍ॅपल वॉच सीरिज 5 आणि सीरिज 4 सोबत असणार आहेत. कोरोनाच्या या संकटात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तातील ऑक्सिजन अवघ्या 15 सेकंदांत मोजण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळेच अशाप्रकारचं वॉच हे अत्यंत उपयुक्त मानलं जात आहे. 

एलिवेशन ट्रेकिंगचा होणार फायदा

अ‍ॅपल वॉच सीरिज 6 मध्ये एलिवेशन ट्रेकिंग देण्यात आले आहे. एलिवेशन ट्रेकिंगमुळे युजरला तो किती उंचीवर आहे याची देखील माहिती मिळण्यास मदत होणार आहे. अ‍ॅपलच्या या सीरिजमध्ये नवीन वॉच फेस देण्यात आले आहेत. जे युजर्स त्यांच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकतात. या सीरिजची किंमत 399 अमेरिकन डॉलरपासून सुरू होते. भारतात Apple Watch 6 Series (GPS) ची किंमत 40 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. तर Apple Watch Series 6 (GPS Cellular) 49 हजार 900 रुपयांनी सुरू होईल. 

आयपॅड एअर (iPad Air) भारतात ऑक्टोबरमध्ये होणार उपलब्ध

Apple Watch SE (GPS) ची किंमत तुलनेनं कमी आहे. हे स्मार्टवॉच 29 हजार 900 रुपयांपासून उपलब्ध असेल. तर Apple Watch SE (GPS Cellular) ची किंमत 33 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. आयपॅड एअर (iPad Air) भारतात ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल. आयपॅड एअरच्या वायफाय मॉडेलची किंमत 54 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. तर वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेलची किंमत 66 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. 64 जीबी आणि 256 जीबी अशा दोन पर्यायांमध्ये आयपॅड एअर उपलब्ध असेल.

iPad (8th generation) 

iPad (8th generation) मध्ये पेन्सिल आणि रेटिना डिस्प्लेची सुविधा देण्यात आली आहे. आयपॅडमध्ये A12 चिपसेटचा वापर करण्यात आला असून गेमिंगची आवड असणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यात आली आहे. वाय-फाय मॉडेल, वाय-फाय अधिक सेल्युलर मॉडेल अशा विविध सुविधांसह आयपॅड उपलब्ध होईल. त्यात 32 जीबी आणि 128 जीबी असे पर्याय आहेत. त्यांची किंमत 29 हजार 900 रुपयांपासून 41 हजार 900 रुपयांपर्यंत असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Apple Event 2020 LIVE Updates: अ‍ॅपलकडून नवीन आयपॅड लॉन्च; विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत

Apple Event 2020: अ‍ॅपलचा नवीन iPad Air लॉन्च, जाणून घ्या खासियत

Apple Event 2020: अ‍ॅपलकडून नवीन वॉच सीरिज, आयपॅड लॉन्च; जाणून घ्या किमती अन् वैशिष्ट्यं

 

 

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञानcorona virusकोरोना वायरस बातम्या