Apple ने आपल्या Apple event 2021 मधून आपले लेटेस्ट iPad आणि iPad Mini असे दोन आयपॅड सादर केले आहेत. नव्या iPad आणि iPad Mini मध्ये कंपनीने A13 Bionic चिपसेटचा वापर केला आहे. Apple Pencil सपोर्टसह सादर करण्यात आलेले टॅबलेट iPad OS 15 वर चालतात. कंपनीने यातील बेजल कमी करून डिस्प्ले मोठा केला आहे. तसेच टच आयडीची जागा बदलून टॉपवर असलेल्या बटनमध्ये एम्बेड करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया iPad 2021 आणि iPad Mini ची माहिती.
Apple iPad 2021
Apple च्या लेटेस्ट iPad 2021 च्या डिजाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. नव्या व्हर्जनमध्ये 10.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1620 x 2160 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या आयपॅडमध्ये कंपनीचा A13 Bionic चिपसेट देण्यात आला आहे, जो जुन्या आयपॅडच्या तुलनेत 20 टक्के वेगवान आहे. iPad 2021 अॅप्पलच्या लेटेस्ट iPadOS 15 वर चालतो . फोटोग्राफीसाठी यात 8MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर iPad मध्ये अपग्रेडेड 12MP Ultra-Wide फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Apple iPad 2021 ची किंमत
Apple iPad 2021 चा Wi-Fi मॉडेल भारतात 30,900 रुपयांची प्रारंभिक किंमतीत उपलब्ध होईल. तर Wi-Fi + Cellular मॉडेलची किंमत 42,900 रुपये असेल. भारतात नवीन iPad स्पेस ग्रे आणि आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध होईल. यूएसमध्ये नवीन आयपॅड 24 सप्टेंबरपासून विकत घेता येईल. परंतु भारतातील उपलब्धतेची माहिती अजून मिळाली नाही.
Apple iPad Mini 2021
नवीन iPad Mini मध्ये 8.3-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो, जो 500 nits मॅक्सिमम ब्राईटनेससह सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मिनी आयपॅडमध्ये कंपनीचा लेटेस्ट A15 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. Touch ID एम्बेडेड लॉक बटणसह यात पहिल्यांदाच USB-C पोर्ट देण्यात आला आहे. अॅप्पल मिनी आयपॅड 5G कनेक्टिविटीसह सादर झाला आहे. फोटोग्राफीसाठी यात 12MP चा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, जो 4K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. तसेच यात सेंटर स्टेज फिचरसह 12MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा मिळतो.
Apple iPad Mini 2021 ची किंमत
नवीन iPad mini ची किंमत भारतात 46,900 रुपयांपासून सुरु होईल, हा Wi-Fi only मॉडेल असेल. आयपॅड मिनीच्या Wi-Fi+ Cellular मॉडेलसाठी देशात 60,900 रुपये मोजावे लागतील. हे दोन्ही मॉडेल 64GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होतील. हा आयपॅड ब्लॅक, व्हाईट, डार्क चेरी, इंग्लिश लॅव्हेंडर आणि इलेक्ट्रिक ऑरेंज रंगात विकत घेता येईल.