जगभरातील अनेक लोकांची नजर अॅपलच्या इव्हेंटवर असते. विशेषकरून अॅपलचे फॅन्स यावर लक्ष ठेवून असतात. मंगळवारी अॅपल इव्हेंटदरम्यान कंपनीनं आपली अॅपल वॉच सीरिज ९ लाँच केली. यानंतर कंपनीनं आपली बहुप्रतीक्षीत iPhone 15 सीरिज लाँच केली. कंपनीनं अॅपल इव्हेंटदरम्यान iPhone 15 आणि iPhone 15 Plus लाँच केले.iPhone 15 हा 48MP च्या मेन कॅमेऱ्यासोबत येईल. याशिवाय यात अन्य फीचर्सही मिळतील. समोरील बाजूलाही आता नवं डिझाईन मिळणार आहे. कंपनीनं नॉच काढून टाकली असून नॉन प्रो व्हेरिअंटमध्येही आता डायनॅमिक आयलंड डिस्प्लेचा वापर करण्यात आलाय. याचाच अर्थ आता नॉच ऐवजी पंच होल कटआऊट मिळेल.
A16 Bionic चिपसेटकंपनीनं नव्या आयफोन १५ सीरिजमध्ये युझर्सना नवा 48MP चा मेन कॅमेरा दिलाय. यामध्ये कंपनीनं A16 Bionic चिपसेटचा वापर केलाय. यापूर्वीच्या सीरिजमध्ये केवळ प्रो व्हेरिअंटमध्ये हा चिपसेट देण्यात आला होता. नॉन प्रो मॉडेल्सही यापूर्वीच्या तुलनेत आता चांगले परफॉर्मन्स देऊ शकणार आहेत. यामध्ये उत्तम बॅटरी बॅकअपही मिळेल. याशिवाय कंपनीनं यात वायर आणि वायरलेस दोन्हीप्रकारचे कनेक्टिव्हीटी पर्याय दिलेत.
टाईप सी पोर्टकंपनीनं आपल्या नवीन आयफोन १५ सीरिजमध्ये USB टाइप-सी दिलंय. याच्या मदतीनं इयरबड्स, आयफोन आणि अन्य प्रोडक्ट्सही चार्ज करता येतील असं कंपनीनं म्हटलंय.
किती असेल किंमतकंपनीनं आयफोन १५ सीरिजच्या किंमतीची घोषणा केलीये. iPhone 15 च्या बेस मॉडेलची किंमत ७९९ डॉलर्स असेल. तर iPhone 15 Plus ची किंमत ८९९ डॉलर्स पासून सुरू होईल. कंपनीनं भारतीय बाजारपेठेतील या फोनच्या किंमतीची घोषणा केली नाही.iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max कंपनीने यामध्ये टायटॅनियम बॉडीचा वापर केला आहे. यामध्ये बेझल्स देखील कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे तुम्हाला मोठी स्क्रीन मिळेल. ही सीरिज 6.1-इंच आणि 6.7-इंच स्क्रीन मध्ये उपलब्ध असेल. हे स्क्रीन साईज तुम्हाला अनुक्रमे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये मिळतील.प्रो व्हेरिअंटमध्ये नवा चिपसेटकंपनीने प्रो वेरिएंटमध्ये अॅक्शन बटण दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. या बटणाचा वापर अनेक कामांसाठी कस्टमाईज करता येऊ शकतो. याशिवाय प्रो सीरिजमध्ये कंपनीनं A17 बायोनिक चिपसेट दिली आहे. तसंच हा स्मार्टफोन फोन USB Type-C पोर्टसह उपलब्ध असेल.iPhone 15 Pro मध्ये जबरदस्त कॅमेरायामध्ये 48MP प्रायमरी लेन्ससह कॅमेरा सेटअप देण्यात आलंय. यामध्ये तुम्हाला लो लाईटमध्ये चांगले फोटो क्लिक करण्याचं फीचर मिळेल. याशिवाय यात 3X टेलिफोटो लेन्स देण्यात आलीये. मॅक्स व्हेरियंटमध्ये 5X ऑप्टिकल झूम फीचर असेल. कंपनीनं यात यामध्ये 12MP टेलिफोटो लेन्सही दिली आहे. यासोबतच यूजर्सना एक उत्कृष्ट मॅक्रो कॅमेरा मिळेल.