अॅप्पल आपल्या ऑक्टोबरच्या Unleashed Event च्या माध्यमातून नवीन मॅकबुक, एयरपॉड्स आणि होमपॉड मिनी सादर केले आहेत. आता तिसऱ्या जेनरेशनच्या TWS इयरबड्स AirPods, M-सीरिजच्या नव्या MacBook Pro लॅपटॉप आणि स्मार्ट स्पीकर HomePod mini च्या नव्या कलर व्हेरिएंटची भारतातील किंमत समोर आली आहे. तसेच हे प्रोडक्ट कुठून विकत घेता येतील याची माहिती देखील आम्ही देत आहोत.
नव्या MacBook Pro ची किंमत
कंपनीने आतापर्यंतचे सर्वात पॉवरफुल नोटबुक सादर केल्याचा दावा केला आहे. नवीन MacBook Pro मध्ये कंपनीने नवीन M1 Pro आणि M1 Max चिपसेटचा वापर केला आहे. जे कंपनीने बनवले आहेत. या नव्या मॅकबुकच्या प्रोच्या 14-इंचाच्या मॉडेलची किंमत 1,94,900 रुपयांपासून सुरु होईल. तर विद्यार्थ्यांसाठी प्रारंभिक किंमत 1,75,410 रुपये असेल. तर 16-इंचाच्या MacBook Pro ची किंमत 2,39,900 पासून सुरु होईल. विद्यार्थी हा मॉडेल 2,15,910 रुपयांपासून विकत घेऊ शकतील. नवीन MacBook Pro मॉडेल M1 Pro आणि M1 Max चिपसेटसह कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येतील. 26 ऑक्टोबरपासून हे दोन्ही मॉडेल्स स्टोर्समध्ये उपलब्ध होतील.
AirPods 3 ची भारतीय किंमत Apple AirPods 3 ची किंमत भारतात 18,500 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स देशात अधिकृत वेबसाईटवरून प्री-ऑर्डर करता येतील. सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असलेले AirPods 3 येत्या 26 ऑक्टोबरपासून स्टोर्समधून विकत घेता येतील.
Apple HomePod mini ची भारतीय किंमत अॅप्पलच्या स्मार्ट स्पीकर HomePod mini चे येलो, ब्लु आणि ऑरेंज असे तीन नवीन कलर व्हेरिएंट उपलब्ध झाले आहेत. ज्यांची किंमत 9,900 रुपयांपासून सुरु होईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून हे नवीन कलर व्हेरिएंट विकत घेता येतील.