Apple Event 2021: अॅप्पलने आपल्या आगामी व्हर्च्युअल इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट 18 ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरु होईल. समोर आलेल्या टीजरमधून कंपनी आपला नवीन चिपसेट या इव्हेंटमधून सादर करणार असल्याचे दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या इव्हेंटमधून अॅप्पल M1x प्रोसेसर, MacBook Pro आणि Mac Mini सह इतर काही प्रोडक्टस बाजारात उतरवू शकते.
Apple Unleashed Event मध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच?
अॅप्पलच्या इव्हेंट टीजरमधून लाँच होणाऱ्या प्रोडक्टची माहिती मिळाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार या इव्हेंटमधून दोन साईजेसमध्ये MacBook Pro मॉडेल लाँच करू शकते, हे लॅपटॉप कंपनीच्या M1X चिपसेटसह बाजारात येतील, ज्यात MagSafe चार्जिंग मिळू शकते. नवीन फ्लॅट एज डिजाईनसह हे लॅपटॉप सादर केले जाऊ शकतात. नवीन मॅक बुक 14-inch आणि 16-inch अशा दोन स्क्रीन साइजमध्ये सादर केला जाऊ शकतो.
रिपोर्ट्सनुसार अॅप्पल हायएन्ड मॅक मिनी लाँच करू शकते, जो पॉवरफुल असेल. त्याचबरोबर कंपनी Airpods देखील लाँच करू शकते. या इव्हेंटमधून AirPods 3 लाँच केले जाऊ शकतात. सॉफ्टवेयर लाँच बद्दल बोलायचे झाले तर WWDC मध्ये MacOS Monterey ची घोषणा अॅप्पलने केली होती. हा नवीन ओएसनव्या सफारी ब्राउजर, सेकेंडर स्क्रीन सारख्या फीचर्ससह या इव्हेंटमधून सादर केला जाऊ शकतो.