वनप्लस 6T च्या अनावरणादिवशीच अॅपलने आपला इव्हेंट ठेवल्याने वनप्लसला अखेर एक दिवस आधीच लाँचिंग इव्हेंट घ्यावा लागला होता. मंगळवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये अॅपलने दोन नवे आयपॅड ड्युअल सिम सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत.
अॅपलने आयपॅड प्रोचे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत. iPad Pro 11 इंच आणि iPad Pro 12.9 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच अॅपलचा अद्ययावत प्रोसेसर A12X बायोनिक चिप देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे हे आयपॅड आतापर्यंतचे सर्वात कमी जाडीचे आहेत. जाडी केवळ 5.9mm आहे.
पहिल्यांदाच ड्युअल सिम आणि फेसआयडी फिचरनव्या आयपॅड प्रोमध्ये पहिल्यांदाच ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये आयफोन Xs सारखेच एक नॅनो सिम आणि दुसरे eSIM देण्यात आले आहे. भारतात केवळ जिओ आणि एअरटेलच ही सुविधा देणार आहेत.
याशिवाय iPad मध्ये फेस आईडी फीचर देण्यात आले आहे. यामुळे चेहऱ्याची ओळख पटवून आयपॅडला अनलॉक केले जाऊ शकते.
मोठा बदल....आयपॅडच्या 8 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच होम बटन हटविण्यात आले आहे. स्कीन साईज वाढविण्यासाठी हे करण्यात आले आहे.
भारतातील किंमतiPad Pro च्या 11 इंचाच्या वाय-फाय मॉडेलची किंमत 71,900 रुपये आणि वाय-फाय सेल्युलर मॉडेलची किंमत 85,900 रुपयांपासून सुरु झाली होती.iPad Pro च्या 12.9 इंचाच्या वाय-फाय मॉडेलची किंमत 89,900 रुपये आणि वाय-फाय सेल्युलर मॉडेलची किंमत 1,03,900 रुपये ठेवण्यात आली आहे.
पेन्सिल आणि स्मार्ट किबोर्डसाठी वेगळे पैसे iPad Pro ची वेगळी पेन्सिल-2 आणि स्मार्ट किबोर्डसाठी वेगवेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. पेन्सिलची किंमत 10,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 11 इंचाच्या मॉडेलसाठी किबोर्ड 15,900 रुपये आणि 12.9 इंचाच्या आयपॅडसाठी 17,900 रुपये मोजावे लागणार आहेत.