Apple'वर लाखो आयफोनमध्ये खराब बॅटरी बसवल्याचा आरोप आहे. तसेच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही कमतरता लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच याबाबत Apple यूजर्सना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Appleच्या या हुशारीसाठी अॅपलवर २ बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १६३ अब्ज रुपयांचा खटला दाखल करण्यात आला आहे.
तुमचे व्हॉट्सॲप बंद हाेणार का?; ४७ लाख युझर्सचे WhatsApp बॅन
Apple'ने मान्य केलं
Apple ने मान्य केले की iPhone 6s मॉडेलच्या काही युनिट्समध्ये बॅटरीची समस्या आहे. कंपनीने याबाबत तातडीने पावले उचलून वेळेत समस्या सोडवली. काही स्मार्टफोनमध्ये अशी समस्या नव्हती. सर्व स्मार्टफोन्सवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जे पूर्णपणे निराधार आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आयफोनमधील खराब बॅटरीची चिंता करण्याची गरज नाही.
हे प्रकरण युनायटेड किंगडमशी संबंधित आहे, तिथे ग्राहक जस्टिन गुटमन यांनी खटला दाखल केला आहे. युनायटेड किंगडममध्ये अॅपलवर १.६ अब्ज पौंडांचा खटला दाखल करण्यात आला आहे. या रकमेत व्याजाचाही समावेश आहे. Apple ने आयफोनमधील बॅटरीमधील दोष झाकून टाकला आणि वापरकर्त्यांना न कळवता पॉवर मॅनेजमेंट टूल बसवून तो दुरुस्त केल्याचा आरोप या खटल्यात करण्यात आला आहे. iOS १५.४ लॉन्च झाल्यानंतर लवकरच बॅटरी संपण्याच्या तक्रारी आल्या होत्या. नवीन अपडेटनंतर फोनची बॅटरी लवकर संपत आहे, असं काही वापरकर्त्यांनी सांगितले.