देशातील सर्व मोबाईलवर सध्या गुगल आणि एपलच्या ऑपरेटिंग सिस्टिम वापरल्या जात आहेत. या दोन्ही बलाढ्या कंपन्या आहेत. परंतू जगातील आयटी सेक्टरवर भारतीयांच्या हुशारीचे प्रभुत्व आहे. असे असताना भारताने आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम विकसित केली असून या बलाढ्य कंपन्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे.
भारत लवकरच आपली ऑपरेटिंग सिस्टिम BharOS लाँच करणार आहे. ही ओएस आयआयटी मद्रासने बनविलेली आहे. सुमारे 100 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना BharOS चा फायदा होईल असा दावा केला जात आहे. हे ऑपरेटिंग सॉफ्टवेअर उर्वरित OS पेक्षा अधिक सुरक्षित असेल.
BharOS ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांना आवश्यक एप्स इन्स्टॉल करण्याची परवानगी देते. गुगल आयओएससारखी आधीपासूनच इन्सॉल अॅप नसणार आहेत. युजर त्यांना नको असेल तरी ती अॅप काढून टाकू शकत नाहीत. यामुळे मोबाईलची मोठी स्पेस वापरली जाते. त्यापासून सुटका होणार आहे. तसेच BharOS वरून वापरकर्त्यांना वेळेवर सॉफ्टवेअर अपडेट्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
BharOS लॉन्च झाल्यानंतर स्मार्टफोनच्या किंमतीत कपात होऊ शकते. कारण मोबाईल निर्मात्यांना ओएससाठी गुगलवर अवलंबून राहावे लागणार नाही. गुगलकडून मनमानी शुल्क वसूल केले जाते, ते थांबणार आहे. अॅप डेव्हलपर्ससाठी हा मोठा दिलासा ठरू शकतो. तसेच त्यांच्या बिलिंगवर करही कमी होऊ शकतो.