नवी दिल्ली - Apple ने Whatsapp चं टेन्शन वाढवलं आहे. कंपनीने 22 जूनपासून सुरू झालेल्या WWDC इव्हेंटमध्ये कंपनीने iOS 14 ची घोषणा केली. नवीन ओएसमध्ये अनेक नवनवीन शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. अॅपलने iOS 14 सोबतच imessage मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत. iOS 14 मध्ये मेसेजसाठी देण्यात आलेले नवे फीचर्स हे दुसऱ्या टक्कर देऊ शकतात असा दावा कंपनीने केला आहे.
अॅपलने मेसेजमध्ये सुधारणा करण्यासाठी खूप मेहनत घेतली असून युजर्सना आता त्यामुळे ग्रुप चॅटिंगचा जबरदस्त अनुभव मिळणार आहे. iOS 14 अपडेट केल्यानंतर युजर्स ग्रुप चॅट्स पर्सनल फोटो किंवा इमोजीला मेन इमेज म्हणून सेट करून कस्टमाईज करू शकतात. यासोबतच चॅटिंग दरम्यान युजर्स ग्रुपप मेंबरचे प्रोफाईल आयकॉन देखील मेन ग्रुप इमेजसोबत पाहता येणार आहे.
मेसेजचा अनुभव युजर्सना अधिक चांगला यावा यासाठी अॅपल Mentions फीचर आणणार आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला मार्क करण्यासाठी आता @ चा वापर करण्याची गरज पडणार नाही. मेसेजेस युजरला कॉन्टॅक्टचं नाव टाईप करताच लगेच सजेशन आणि सिलेक्टचा पर्याय देणार आहे. युजरने कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यावर तो निळ्या रंगात दिसेल आणि मेसेज डायरेक्ट केला जाईल.
नव्या अपडेटमध्ये एखाद्या चॅटमध्ये जर कोणी मेंशन केलं तर युजरला त्याचं नोटिफिकेशन पाठवलं जाणार आहे. अॅपलने Whatsapp ला टक्कर देण्यासाठी आणखी एक दमदार फीचर आणलं आहे. अॅपल युजर मेसेज चॅटिंग दरम्यान ते संभाषण पिन देखील करू शकतात. सर्वात जास्त चॅटिंग करणारा नंबर सर्वात वर असणार आहे. अॅपलने आपल्या या अपडेटमध्ये memojis चांगल्या करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. कंपनी iOS 14 सप्टेंबर 2020 पर्यंत लाँच करू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा
"देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार जबाबदार", सोनिया गांधींचा हल्लाबोल
लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार
Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध
CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार