Apple चे आयफोन्स लाँच होण्यापूर्वीच चर्चेत असतात. आता कंपनी आपली आगामी iPhone 13 सीरिज सप्टेंबर 2021 मध्ये सादर करणार आहे. या सीरिजमध्ये चार मॉडेल सादर केले जाऊ शकतात. ही आगामी सीरिज जुन्या iPhone 12 च्या डिजाईनसह सादर केली जाऊ शकते. परंतु यातील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये सुधार केला जाऊ शकतो. Apple आगामी iPhone च्या कॅमेरा आणि बॅटरीमध्ये मोठे बदल करू शकते. Bloomberg च्या रिपोर्टनुसार Apple यावर्षी कमीत कमी तीन नवीन कॅमेरा आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर सादर करणार आहे.
Apple iPhone 13 सीरीजचे लीक कॅमेरा फीचर्स
Bloomberg ने अॅप्पलच्या आगामी iPhone 13 लाइनअपमधील कॅमेरा फीचर्सची माहिती एका रिपोर्टमधून सांगितली आहे. त्यानुसार कंपनी आगामी आयफोनमध्ये व्हिडीओ पोर्टेट मोड देऊ शकते. या मोडद्वारे शूट केलेल्या व्हिडीओचा बॅकग्राऊंड ब्लर असेल. तसेच नवीन ProRes व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर HD किंवा 4K क्लिप्स पोस्ट प्रोडक्शनसाठी हायर क्वालिटी फॉर्मेंटमध्ये साठवण्यास मदत करेल. जेणेकरून एडिटिंग करताना एडिटर्सना मदत होईल.
फोटोजचा लूक आणि कलर सुधारण्यासाठी Apple नवीन फिल्टर सिस्टम देखील सादर करणार आहे. या फिचरमध्ये विविध फिल्टर्स दिले जातील. त्याचबरोबर युजर्स कलर टेंप्रेचर देखील सेट करू शकतात. आगामी iPhone 13 च्या प्रो व्हर्जनमध्ये तीन कॅमेरा सेन्सरसह LED फ्लॅश आणि LiDAR सेन्सर दिला जाऊ शकतो. आगामी आयफोन 5 पीस लेन्स ऐवजी 6-पीस लेन्ससह सादर केले जाऊ शकतात. अॅप्पल अनॅलिस्ट मिंग-ची कू यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रो मॉडेलमधील अल्ट्रावाईड कॅमेऱ्यात ऑटोफोकस सपोर्ट दिला जाऊ शकतो.
Apple iPhone 13 चे संभाव्य स्पेसिफिकेशन
आगामी आयफोन सीरिज जुन्या iPhone 12 च्या डिजाईनवर सादर होणार असली तरी यात छोटी नॉच देण्यात येईल. ईयरपीस स्पिकर टॉप बॅजलमध्ये टाकून नॉचचा आकार केला जाईल. आगामी आयफोनच्या प्रो मॉडेलमध्ये 120Hz LTPO डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच iPhone 13 लाइनअपमध्ये A15 Bionic चिपसेटसह 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. या सीरिजमधील आयफोन्समध्ये आधीच्या तुलनेत मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.