शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

भारतात होणार Apple iPhone 13 ची निर्मिती, किंमत होणार का कमी?  

By सिद्धेश जाधव | Published: April 11, 2022 7:29 PM

Apple चा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 13 आता भारतात निर्माण होऊ लागला आहे.  

Apple iPhone 13 हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा भारतातील अनेकांच्या स्वप्नातील स्मार्टफोन आहे. कंपनीच्या अनेक स्मार्टफोन्सची निर्मिती Foxconn कंपनी करते. आता फॉक्सकॉनच्या चेन्नई येथील प्लांटमध्ये आता iPhone 13 निर्मिती सुरु झाली आहे. लवकरच Foxconn व्यतिरिक्त Wistron आणि Pegatron देखील हा फोन असेम्ब्ल करतील. 

Apple India च्या प्रवक्त्यांनी ET Telecom ला भारतात iPhone 13 ची असेम्ब्ली सुरु झाल्याची माहिती दिली आहे. “तसेच या फोनबाबत आपण खूप उत्साहित आहोत. हा फोन सुंदर डिजाइन आणि अ‍ॅडव्हान्स कॅमेरा सिस्टमसह येतो, त्यामुळे फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करतायेते. तसेच, यात A15 Bionic चिप देण्यात आली आहे, ज्यामुळे परफॉर्मन्स सुधारते,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.  

किंमतीवर होणार का परिणाम?  

एक्सपर्ट्सनुसार, भारतात iPhone 13 ची निर्मिती झाल्यामुळे फोनच्या किंमतीवर परिणाम होणं अपेक्षित आहे. परंतु याआधी देखील ज्या आयफोन्सची निर्मिती देशात झाली त्यांच्या किंमती कंपनीनं कमी केल्या नव्हत्या. त्यामुळे लोकल प्रोडक्शनमुळे जो फायदा होईल तो अ‍ॅप्पल स्वतःकडे ठेवण्याची शक्यता जास्त आहे.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान