शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

iPhone 13 ला सुपरफास्ट 25W चा चार्जर; पण अ‍ॅडॅप्टर, केबलची किंमत वाचून बेशुद्ध व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 7:45 PM

Apple iPhone 13 launch date, features rumor's: 20W च्या तुलनेत 25W चा फायदा तसा काहीच होणार नाही. वेळ तेवढाच लागण्याची शक्यता आहे. कारण नव्या आयफोनमध्ये बॅटरी आताच्यापेक्षा मोठी दिली जाणार आहे.

अ‍ॅपल (Apple) या जगप्रसिद्ध कंपनीचा आयफोन 13 (iPhone 13) लवकरच बाजारात येणार आहे. या फोनला सुपरफास्ट 25W चा चार्जर असणार आहे. काही मिनिटांत हा फोन चार्ज होईल. तास तासभर चार्ज करण्याची गरज लागणार नाही. परंतू हा चार्जर नेहमीप्रमाणे आयफोन 13 सोबत येणार नाही. तुम्हाला तो विकत घ्यावा लागणार आहे. पण त्याची किंमत ऐकून गांगराल एवढे नक्की. (Apple iPhone 13 to support 25W wired charging, but accesories too expensive.)

चीनमधून याबाबतच्या अफवा उडाल्या आहेत. आयफोन 12 हा 20W च्या चार्जरला सपोर्ट करतो. यामुळे नव्या आयफोनला 25W चा चार्जर मिळेल. सध्याच्या 20W च्या अ‍ॅडॅप्टरची किंमत  1900 रुपये आहे, तर त्याच्या 1 मीटर चार्जिंग केबलची किंमत 3500 रुपये आहे. दोन्ही विकत घेतल्यास 5400 रुपये मोजावे लागतात. तर अ‍ॅपलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर फक्त 30W पॉवर अ‍ॅडॅप्टरची किंमत ही 4900 रुपये आहे. मग केबलची किंमत किती असेल विचारच न केलेला बरा. अशावेळी 25W चा चार्जर या किंमतींच्यामध्ये असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

फरक काहीच पडणार नाही....20W च्या तुलनेत 25W चा फायदा तसा काहीच होणार नाही. वेळ तेवढाच लागण्याची शक्यता आहे. कारण नव्या आयफोनमध्ये बॅटरी आताच्यापेक्षा मोठी दिली जाणार आहे. सॅमसंग गॅलॅक्सी S21मध्ये 25W चा चार्जर येतो. 

कधी लाँच होणार... (Apple iPhone 13 launch date)आयफोन 13 सीरीज ही सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग (LiDAR) स्कॅनिंग टेक्नॉलॉजी देण्यात येईल. अ‍ॅपल वॉचसारखा ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि वाय फाय 6E कनेक्टिव्हीटी देण्यात य़ेण्याची शक्यता आहे. पर्ल आणि सनसेट गोल्ड या दोन नवीन रंगांत फोन लाँच हेण्याची शक्यता आहे. तसेच वायरलेस चार्जिंगदेखील मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपल