Apple iPhone 15 भारतात 22 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. त्याआधीच भारतात याला बंपर बुकिंग मिळत आहे. शुक्रवारपासून याची सुरुवात झाली आहे. आयफोन 14 सीरीजच्या तुलनेत आयफोन 15 चे प्री-बुकिंग 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहे. सध्या हे प्री-बुकिंग आणखी 4 दिवस सुरू राहणार आहे.
या मॉडेलला सर्वाधिक मागणी आयफोन 15 सीरीज अंतर्गत 4 मॉडेल लॉन्च केले गेले आहेत. पण भारतात सर्वात जास्त मागणी iPhone 15 Pro Max ला दिसून येत आहे. हा या मालिकेतील सर्वात प्रीमियम फोन आहे, ज्याची किंमत 1.59 लाख ते 1.99 लाख रुपये आहे.
भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन यावेळी अॅपलने विशेष तयारी केली आहे. जगातील वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी अॅपल यावेळी आपला सर्वात मोठा लॉन्च स्टॉक रिलीज करणार आहे. कंपनी पहिल्या बॅचमध्ये iPhone 15 सीरीजचे सुमारे 2.70 लाख ते 3 लाख फोन रिलीज करेल. आयफोन 14 लाँचच्या वेळी जारी केलेल्या स्टॉकच्या दुप्पट आहे.
आणखी प्रतीक्षा करावी लागेलज्या पद्धतीने Apple iPhone 15 चे बुकिंग केले जात आहे, त्यामुळे तुम्हाला डिलिव्हरीसाठी अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. आयफोन 15 प्रो मॅक्ससाठी जास्तीत जास्त बुकिंग सुरू आहे. Apple iPhone 15 सीरीजचे काही फोन भारतात 14 ऑक्टोबरपासूनच उपलब्ध होतील. तर काहींची डिलिव्हरी 2 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.