शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

Apple iPhone 15 Ultra ची किंमत लॉन्चपूर्वी लीक, बजेटमध्ये बसणार का? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:50 PM

Apple iPhone 15 Ultra Price: iPhone निर्माता Apple कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone १४ सीरीज लाँच केली होती.

Apple iPhone 15 Ultra Price: iPhone निर्माता Apple कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone १४ सीरीज लाँच केली होती. त्यानंतर बाजारात iPhone 15 ची चर्चा जोरात सुरू झाली आहे. आयफोनची नवी सीरिज  २०२३ च्या लॉन्च होण्याची अपेक्षा नाही. आयफोन बद्दल यूजर्समध्ये इतकी क्रेझ आहे की iPhone 15 Ultra ची संभाव्य किंमत आणि फीचर्स लीक होत आहेत. नुकतंच एका अहवालात दावा करण्यात आलाय की आगामी iPhone 15 Ultra ची किंमत iPhone 14 Pro Max पेक्षा २०० डॉलरने (सुमारे १६,५०० रुपये) अधिक असू शकते. 

कंपनी iPhone 15 Ultra जवळपास १,२९९ डॉलरच्या (१,०८,००० रुपये) सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करू शकते. फोर्ब्सनं LeaksApplePro च्या माध्यमातून दिलेल्या अहवालात याचा दावा केला आहे. वर्षातील सर्वात महाग iPhone - iPhone Pro Max ची मूळ किंमत १,०९९ डॉलर (सुमारे ९०,८०० रुपये) आहे. जर हे लीक खरे असेल तर आगामी iPhone 15 Ultra ची किंमत iPhone 14 Pro Max पेक्षा २०० डॉलर (सुमारे १६,५०० रुपये) जास्त असू शकते.

किमतीत सर्वात मोठी वाढआयफोनच्या इतिहासातील एका सीरिजच्या दुसऱ्या सीरिजच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी वाढ असेल. रिपोर्टनुसार, आगामी iPhone चे बेस मॉडेल 256GB स्टोरेज सह ऑफर केला जाऊ शकतो. त्याचवेळी, नवीन आयफोनच्या टॉप-व्हेरियंटमध्ये 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज दिले जाऊ शकते, ज्यासाठी तुम्हाला १,७९९ डॉलर (सुमारे १,४८,००० रुपये) खर्च करावे लागतील.

टायटॅनियम बॉडी मिळेलApple iPhone 15 Ultra सध्याच्या A16 पेक्षा मजबूत चिपसेटच्या समर्थनासह लॉन्च केला जाऊ शकतो. आयफोन १४ सीरिजच्या तुलनेत नवीन आयफोनची रॅम जास्त असेल असं बोललं जात आहे. त्याचवेळी हा फोन प्रीमियम टायटॅनियम बॉडीसह ऑफर केला जाऊ शकतो. टायटॅनियम केवळ आयफोन-१५ अल्ट्राला प्रीमियम लूक देणार नाही तर ते आयफोनचे वजन देखील हलके करेल.

ड्युअल फ्रंट कॅमेरे आणि टाइप-सी पोर्टसध्याच्या आयफोन बॉडीच्या तुलनेत टायटॅनियम ३५ पट अधिक महाग आहे. नव्या iPhone मध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. असे झाल्यास, हा पहिला iPhone असेल ज्यामध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. याशिवाय, iPhone प्रथमच USB Type-C चार्जिंग पोर्टसह लॉन्च केला जाऊ शकतो.

टॅग्स :Apple Incअॅपल