नवी दिल्ली-
Apple कंपनीकडून सातत्यानं iPhone च्या बॅटरीवर काम करत आहे. तरी अजूनही iPhone वापरकर्त्यांना बॅटरीच्या क्षमतेबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: आयफोनमध्ये बॅटरीच्या लाइफबाबतच सर्वाधिक प्रश्नचिन्ह वापरकर्त्यांकडून उपस्थित केले जातात. पण आयफोनच्या बॅटरीची दिर्घकालीन काळजी घेण्यासाठी काही टिप्स आहेत ज्या आपण नक्कीच ट्राय करून पाहू शकतो.
Battery Health
आयफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही स्वतः बॅटरीचे आरोग्य (Health) तपासू शकता. ते तुमच्या फोनमधील बॅटरीची स्थिती दर्शवतं. कंपनीच्या दाव्यानुसार जर तुमच्या फोनची बॅटरी हेल्थ 80% झाली तर तुम्ही ती ताबडतोब बदलावी. पण बॅटरी हेल्थ 80 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तुमची बॅटरी उत्तम काम करत आहे.
Software Update
iPhone च्या सेटिंगमध्ये जाऊन 'General'मध्ये जा. त्यानंतर 'Software Update' वर क्लि करा. जर तुमचा iPhone अपडेट नसेल तर तिथं अपडेट करण्याचा ऑप्शन उपलब्ध असेल. त्यानंतर तुमचा फोन तुम्ही तातडीनं अपडेट करा कारण अपडेट सोबतच तुमच्या फोनचे Bug Fixes होऊन जातात. बॅटरी सिस्टमशी निगडीत अनेक अपडेटेड सॉफ्टवेअर व्हर्जनमध्ये सुधार केले जात असतात.
WiFi चा जास्तीत जास्त वापर करामोबाईल डेटाऐवजी वायफाय वापरण्याचा प्रयत्न करावा. याचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा तुमच्या फोनच्या बॅटरीवर परिणाम होत नाही. यामुळे फोनची बॅटरी नेहमीच निरोगी राहते. सहसा नेटवर्क कनेक्शन नसतानाही फोन 'एअरप्लेन मोड' वर ठेवावा. कारण नेटवर्क नसेल तर फोन नेहमी नेटवर्कचा शोध घेत राहतो. अशाने फोनची बॅटरी लवकर संपते आणि फोन पुन्हा पुन्हा चार्जिंगवर ठेवावा लागतो.