शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

गुड न्यूज! अँड्रॉइडच्या किंमतीत आयफोनची मजा; सर्वात स्वस्त 5G iPhone वर भरघोस सूट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 1:12 PM

iPhone SE 2022 वर iStore आणि Amazon मोठा डिस्काउंट देत आहेत. त्यामुळे हा फोन काही मिड रेंज अँड्रॉइड स्मार्टफोन्स पेक्षाही स्वस्त झाला आहे.  

Apple नं आपला सर्वात स्वस्त 5G iPhone अँड्रॉइड युजर्सना कंपनीच्या इकोसिस्टममध्ये आणण्यासाठी सादर केला आहे. म्हणूनच या फोनमध्ये लेटेस्ट A15 बायोनिक चिपसेट देऊन सुद्धा कंपनीनं फोनची किंमत कमी ठेवली आहे. आता 43,900 रुपयांमध्ये लाँच झालेला iPhone SE 2022 स्मार्टफोन Amazon आणि iStore वर जवळपास 28,000 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.  

iPhone SE 2022 वरील ऑफर 

Apple iStore आणि अ‍ॅमेझॉनवरून हा डिवाइस विकत घेता HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 2000 रुपये पर्यंतचा कॅशबॅक मिळत आहे. परंतु एक्सचेंज ऑफर्समध्ये थोडा फरक आहे. iStore वर तुम्ही तुमचा जुना फोन देऊन 13,000 रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे iPhone SE 2022 फोन फक्त 28,900 रुपयांमध्ये मिळेल.  

अ‍ॅमेझॉनवरून iPhone SE 2022 चा बेस मेमोरी व्हेरिएंट विकत घेताना तुम्ही तुमचा जुना फोन देऊ शकता. इथे 13,850 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. योग्य स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास फक्त 28,050 रुपयांमध्ये एक नवाकोरा आयफोन तुमच्या हातात येईल.  

Apple iPhone SE (2022) चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone SE (2022) ची डिजाईन जुन्या iPhone 8 सारखी आहे. या आयफोनच्या बॅक आणि फ्रंटला देण्यात आलेली ग्लास कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात मजबूत ग्लास आहे. सिक्योरिटीसाठी यात Touch ID देण्यात आली आहे. तसेच यातील IP67 रेटिंग पाणी आणि धुळीपासून वाचवते. हा डिवाइस Red, Black आणि White कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येईल.  

Apple iPhone SE (2022) मध्ये गेल्यावर्षी आलेल्या फ्लॅगशिप iPhone 13 सीरिजच्या A15 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या पावरफुल चिपसेटसह कंपनीनं 5G कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे. हा फोन iOS 15 वर चालेल, तसेच यात फोकस मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या मागे 12MP चा सिंगल कॅमेरा आहे, जो Deep Fusion, Smart HDR 4 आणि फोटो स्टाईलला सपोर्ट करतो. यात चांगली व्हिडीओ रेकॉर्डिंग क्वॉलिटी मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. 

 
टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान