Apple चे स्मार्टफोन्स जितके लोकप्रिय आहेत तितकेच महाग देखील आहेत. जास्त युजर्सना जोडण्यासाठी कंपनी आपल्या फ्लॅगशिप सीरिज सोबत एक स्वस्त सीरिज देखील सादर करत असते. असाच एक सर्वात स्वस्त 5G iPhone येत्या मार्च महिन्यात ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. तसेच आता आगामी iPhone SE 3 (2022) ची किंमत देखील समोर आली आहे.
सर्वात स्वस्त 5G iPhone
iPhone SE 3 (2022) लवकरच 300 डॉलर्स (जवळपास 22,500 रुपये) मध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती मार्केट अॅनलिस्ट, जॉन डोनोवॅन यांनी दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त SE मॉडेल असू शकतो. या मागे अँड्रॉइड युजर्सना आकर्षित करणं हे कारण असू शकतं, असा अंदाज डिसेंबर 2021 मध्ये JPMorgan च्या अॅनलिस्ट्सनी लावला आहे.
मार्चमध्ये होईल लाँच इस दिवस असू शकतो लाँच
लीक्स आणि रिपोर्ट्सनुसार, iPhone SE 3 (2022) स्मार्टफोन अॅप्पलच्या वार्षिक स्प्रिंग लाँच इव्हेंटमध्ये लाँच होऊ शकतो. अॅप्पलचा यावर्षीचा स्प्रिंग इव्हेंट 8 मार्च, 2022 ला सुरु होऊ शकतो. हा स्वस्त आयफोन लेटेस्ट A15 बायोनिक चिपसह बाजारात येण्याची शकयता आहे. तसेच यात iPhone SE 2 (2020) सारखीच डिजाईनसह टच आयडी, ग्लास फ्रंट आणि अॅल्युमिनियम फ्रेम मिळू शकते.
हे देखील वाचा: