Apple iPhone SE 3 Leak: Apple कडून लवकरच iPhone SE3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मार्च २०२२ मध्ये Apple कंपनीकडून याचं लॉन्चिंग करण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील नवी माहिती देखील आता उघड झाली आहे. यात आयफोन एसई-३ ची किंमत आता समोर आली आहे.
मार्केट अॅनालिस्ट John Donovan यानं येऊ घातलेल्या Apple iPhone SE 3 2022 ची किंमत शेअर केली आहे. हा स्मार्टफोन ३०० डॉलर (जवळपास २२ हजार रुपये) इतकी असण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर नव्या iPhone SE 3 ची किंमत iPhone SE 2020 पेक्षाही कमी ठरेल. त्यामुळे iPhone SE 3 हा स्मार्टफोन आयफोनचा सर्वात स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन ठरणार आहे.
नवं काय?कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक प्रोसेसर, 5G सपोर्ट आणि चांगल्या क्षमतेची बॅटरी दिल्याचं बोललं जात आहे. आयफोन एसई-३ ची किंमत जरी २२ हजारांच्या आसपास असेल असं सांगितलं जात असलं तरी याची शक्यता फार कमी असल्याचंही बोललं जात आहे. कारण सध्या आयफोन एसई-२ ची किंमत देखील त्यापेक्षा जास्त आहे.
iPhone SE 3 चे फिचर्स काय?iPhone SE 3 मध्ये iPhone SE 2020 सारखीच 4.7 इंचाची स्क्रिन असणार आहे. नव्या फोनमध्ये अद्ययावत A15 Bionic चिपसेट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याच चिपसेटचा वापर iPhone 13 मध्येही करण्यात आला आहे. म्हणजेच iPhone SE 3 मध्ये 5G सपोर्ट मिळणार आहे. Apple कडून नवा आयफोन एसई-३ हा 4GB RAM आणि 256GB च्या स्टोरेजमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
याआधीच्या SE मॉडेल प्रमाणेच याफोनमध्ये 12MP चा सिंगल रिअर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो. बॅटरीबाबत बोलायचं झालं तर iPhone SE 2020 मध्ये 1821mAh क्षमतेची बॅटची देण्यात आली होती. पण iPhone SE 3 मध्ये त्यापेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. Apple Spring Event मध्ये हा फोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. स्प्रिंग इव्हेंट मार्च किंवा एप्रिल महिन्यात होतो. याआधीच्या रिपोर्टचा हवाला द्यायचा झाला तर iPhone SE 3 भारतात ४० हजारांच्या किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो असं नमूद करण्यात आलं होतं.