शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
6
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
8
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
9
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
10
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
11
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
12
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
13
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
14
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
15
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
16
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
17
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
18
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
20
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...

होळीमुळे नव्हे तर या ऑफरमुळे नाचू लागतील Apple फॅन्स! 30 हजार रुपयांमध्ये मिळत सर्वात स्वस्त 5G iPhone 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 1:29 PM

Apple च्या सर्वात स्वस्त 5G iPhone वर 15 हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे iPhone SE 5G (2022) स्मार्टफोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे.

Apple iPhone SE 5G (2022) लाँच होऊन जास्त दिवस झाले नाहीत. इतक्यात हा स्मार्टफोन 30,000 रुपयांपेक्षा कमीमध्ये विकत घेण्याची संधी दिली जात आहे. विशेष म्हणजे ही ऑफर अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर दिली जात नाही तर India iStore वर सर्वात स्वस्त 5G iPhone आणखीन स्वस्तात मिळत आहे. यासाठी बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर करावा लागेल.  

India iStore ची ऑफर 

iPhone SE 5G (2022) भारतात 43,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु India iStore आयसीआयसीआय, कोटक, आणि एसबीआयच्या कार्ड धारकांना 2,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या फोनवर 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळत आहे. या ऑफर्सचा फायदा घेतल्यास हा आयफोन 28,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Apple iPhone SE (2022) चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone SE (2022) ची डिजाईन जुन्या iPhone 8 सारखी आहे. या आयफोनच्या बॅक आणि फ्रंटला देण्यात आलेली ग्लास कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात मजबूत ग्लास आहे. सिक्योरिटीसाठी यात Touch ID देण्यात आली आहे. तसेच यातील IP67 रेटिंग पाणी आणि धुळीपासून वाचवते. हा डिवाइस Red, Black आणि White कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येईल.  

Apple iPhone SE (2022) मध्ये गेल्यावर्षी आलेल्या फ्लॅगशिप iPhone 13 सीरिजच्या A15 Bionic प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या पावरफुल चिपसेटसह कंपनीनं 5G कनेक्टिव्हिटी देखील दिली आहे. हा फोन iOS 15 वर चालेल, तसेच यात फोकस मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या मागे 12MP चा सिंगल कॅमेरा आहे, जो Deep Fusion, Smart HDR 4 आणि फोटो स्टाईलला सपोर्ट करतो. यात चांगली व्हिडीओ रेकॉर्डिंग क्वॉलिटी मिळेल, असा दावा कंपनीनं केला आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान