Apple आपल्या आयफोन्ससाठी जगभर ओळखली जाते. परंतु कंपनी असे देखील काही प्रोडक्ट्स सादर करते, जे जगाचं लक्ष वेधून घेतात. हे प्रोडक्टस फीचर्स आणि किंमत या दोन्ही कारणांमुळे चर्चेत राहतात. गेल्यावर्षी कंपनीनं एक पॉलिशिंग क्लॉथ सादर केला होता, या कपड्याची किंमत 1,900 रुपयांच्या आसपास होती. आता तर कंपनीनं एक स्मार्ट बॉटल सादर केली आहे जिचं नाव HidrateSpark ठेवण्यात आलं आहे, या बॉटलची किंमत देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
वैशिष्ट्ये
ही बॉटल तुमचा प्रत्येक घोट ट्रॅक करते आणि तो स्मार्टफोनवरील बॉटलच्या अॅप सोबत सिंक करते. ही बॉटल तुम्ही लो एनर्जी ब्लूटूथच्या माध्यमातून iPhone, iPad किंवा Apple Watch शी कनेक्ट करू शकता. यात ग्रीप इम्प्रूव्ह करण्यासाठी सॉफ्ट ग्रीप बॉडी देण्यात आली आहे. या बॉटलमध्ये 592 मिलिलिटर पाणी राहतं.
ही बॉटल चमकून तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करून देते, यासाठी तुम्ही तीन स्टाईल्समधून एकाची निवड करू शकता. यात बीपीए-फ्री, फूड सेफ ट्रायटन आणि पॉलीप्रॉपिलिन प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. कोणत्याही फिटनेस अॅप सोबत ही बॉटल महती सिंक करू शकते. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रोग्रेस देखील बघू शकता. तुम्ही तुमची हरवलेली बॉटल देखील "bottle's last connected location" या फिचरच्या माध्यमातून शोधू शकता.
किंमत
HidrateSpark चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. HidrateSpark Pro ची किंमत 59.95 डॉलर्स (जवळपास 4,600 रुपये) आहे. तर HidrateSpark Pro STEEL व्हेरिएंटची किंमत 79.95 डॉलर्स (जवळपास 6,100 रुपये) आहे. HidrateSpark Pro STEEL दोन कलर सिल्व्हर आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.