अॅपल (Apple) फोल्डेबल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे, असा रिपोर्ट गेल्या वर्षभरापासून येत आहे. मात्र, कंपनीने सॅमसंगला डिस्प्लेची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे सॅमसंगनंतर आता अॅपल कंपनी सुद्धा फोल्डेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन देखील लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण बातमी अशी आहे की, अमेरिकन टेक कंपनी अॅपल सॅमसंगकडून फोल्डेबल डिस्प्ले खरेदी करीत आहे.
Macrumorsच्या रिपोर्टनुसार, मोठ्या प्रमाणात अॅपल कंपनी सॅमसंगकडून फोल्डेबल डिस्प्ले सॅम्पल म्हणून खरेदी करणार आहे. दरम्यान, सॅमसंगकडून अॅपल पहिल्यांदाच अशी खरेदी करत नाही, तर याआधी देखील अॅपलने सॅमसंगकडून OLED पॅनेलची खरेदी केली आहे. पॉप्युलर टिप्स्टर - जे सहसा अँड्रॉइड आधारित उद्योगाच्या बातम्या लीक करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, अॅपलने सॅमसंगला OLED फोल्डेबल स्क्रीनसाठी ऑर्डर दिली आहे.
Iceuniverse च्या म्हणण्यानुसार, अॅपल असा एक आयफोन बनविण्याच्या तयारीत आहे, जो Galaxy Z Fold सारखा फोल्ड होऊ शकेल. त्यांनी ही पोस्ट चिनी सोशल मीडियावर देखील केली आहे. यामध्ये लिहिले आहे की एका वर्षापर्यंत सॅमसंगकडून फोल्डेबल डिस्प्लेची ऑर्डर देण्यात आली आहे. सॅमसंगने आतापर्यंत दोनपेक्षा अधिक फोल्डेबल डिस्प्ले स्मार्टफोन लाँच केले असून अलीकडेच कंपनीने Galaxy Z Fold 2 देखील बाजारात आणला आहे. तर सॅमसंगकडे आता फोल्डेबल डिस्प्लेसाठी आता अनुभव सुद्धा आहे.
अॅपल फोल्डेबल डिस्प्ले असणाऱ्या स्मार्टफोनवर काम करत आहे. तसेच, फोल्डिंग आयफोनचे पेटेंट सुद्धा स्पॉट झाले होते, असे गेल्या वर्षीही एका रिपोर्टमध्ये म्हटले होते. अॅपलच्या फोल्डेबल आयफोनवरून इंडस्ट्रीच्या अंतर्गत लोकांचीही मतं भिन्न आहे. काहीजण म्हणतात की, अॅपल देखील Galaxy Z Fold सारखा फोल्डेबल फोन आणेल, तर काही लोक म्हणतात की, कंपनी सर्फेस ड्युओ सारख्या दोन डिस्प्लेसह स्मार्टफोन लाँच करू शकते.
आणखी बातम्या...
- मराठा आरक्षण : राज्य सरकार सोमवारी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार - अशोक चव्हाण
- 'अमित मालवीय यांना पदावरून हटवा', सुब्रमण्यम स्वामींचा भाजपा आयटी सेलविरोधात मोर्चा
- कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई सूड बुद्धीने, आशिष शेलारांचा पालिकेसह सरकारवर हल्लाबोल
- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका
- जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, महबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर निशाणा
- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"
- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती