Apple ने गेल्या महिन्यात iPhone 13 सीरीज, iPad Mini आणि Apple Watch लाँच केले आहेत. अॅप्पल लवकरच अजून एका इव्हेंटचे आयोजन करून नवीन प्रोडक्ट्स सादर करू शकते. या इव्हेंटची अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार या इव्हेंटमधून M1X प्रोसेसर असलेल्या MacBook Pro सह नवीन मॅक लॅपटॉप लाइनअपसह AirPods 3 आणि मॅक मिनी देखील लाँच केले जाऊ शकतात.
Apple इव्हेंटमधून काय होणार लाँच?
अॅप्पलच्या इव्हेंटची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी M1X प्रोसेसर असलेला MacBook Pro लाँच करू शकते. नवीन फ्लॅट एज डिजाईनसह हे लॅपटॉप सादर केले जाऊ शकतात. नवीन मॅक बुक 14-inch आणि 16-inch अशा दोन स्क्रीन साइजमध्ये सादर केला जाऊ शकतो.
रिपोर्ट्सनुसार अॅप्पल हायएन्ड मॅक मिनी लाँच करू शकते, जो पॉवरफुल असेल. त्याचबरोबर कंपनी Airpods देखील लाँच करू शकते. या इव्हेंटमधून AirPods 3 लाँच केले जाऊ शकतात. सॉफ्टवेयर लाँच बद्दल बोलायचे झाले तर WWDC मध्ये MacOS Monterey ची घोषणा अॅप्पलने केली होती. हा नवीन ओएसनव्या सफारी ब्राउजर, सेकेंडर स्क्रीन सारख्या फीचर्ससह या इव्हेंटमधून सादर केला जाऊ शकतो.