शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

समारंभात मिरवण्यापुरता भाड्यानं घेता येणार iPhone, ईएमआयपेक्षा स्वस्त असू शकते Apple ची सेवा

By सिद्धेश जाधव | Published: March 25, 2022 3:21 PM

अ‍ॅप्पलचे हार्डवेयर प्रोडक्ट्स लवकरच भाड्यानं घेता येतील. सध्या कंपनी आपल्या या सेवेची चाचणी करत आहे.  

Apple लवकरच हार्डवेयर प्रोडक्ट्ससाठी सब्सक्रिप्शन सेवा सुरु करू शकते. या सेवेमुळे आयफोन, आइपॅडसह अन्य डिवाइस भाड्यानं घेता येतील. रिपोर्टनुसार, युजर्स एका अ‍ॅपमधून मासिक हप्ता देऊन अ‍ॅप्पलचे हार्डवेयर प्रोडक्ट्स घेऊ शकतील. सध्या कंपनी या सेवेची चाचणी करत आहे आणि यावर्षीच्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षी ही सेवा सर्वांच्या भेटीला येईल.  

Bloomberg च्या रिपोर्टनुसार, अ‍ॅप्पल जसं सॉफ्टवेयरचं सब्सक्रिप्शन देते तसं आता हार्डवेयर प्रोडक्ट्स देखील सब्सक्रिप्शनवर विकू शकते. कंपनीचा सब्सक्रिप्शन सर्व्हिसवर विश्वास आहे म्हणून Apple Music, iCloud, Apple TV Plus, Apple Fitness Plus आणि Apple Arcade सारख्या सेवांसाठी मंथली सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. हा अ‍ॅप्पलच्या कमाईचा एक मार्ग आहे.  

अ‍ॅप्पल आपले प्रोडक्ट ईएमआयवर देखील विकते परंतु नवीन सेवा तशी नसेल. हार्डवेयर सर्व्हिसची सब्सक्रिप्शन फी प्रोडक्टच्या ईएमआय इतकी नसेल. ईएमआयमध्ये युजरला एक ते दोन वर्षात सर्व किंमत द्यावी लागते. तसेच कंपनी हार्डवेयर सोबत सॉफ्टवेयर सेवा देखील एकाच सब्सक्रिप्शनमध्ये देऊ शकते. या नव्या सेवेत नवीन डिवाइसवर अपग्रेड करण्याचा पर्याय मिळेल की नाही याची माहिती मिळाली नाही.  

कंपनीच्या इतिहासात प्रथमच डिवाइस लीजवर देण्याची सब्सक्रिप्शन सेवा अ‍ॅप्पल सादर करू शकते. यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत आयफोन, मॅकबुक, आयपॅड इत्यादी महागडे डिवाइस वापरता येऊ शकतील. तसेच कंपनीला देखील कमाईचा एक नवा मार्ग मिळेल.  

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान