Apple Watch Blast: काही दिवसांपूर्वीच टीव्हीच्या स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. यानंतर आता स्मार्टवॉचची बॅटरी फुटल्याची माहिती मिळतीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका व्यक्तीने त्याच्या अॅपल वॉचची (Apple Watch) बॅटरी अति गरम होऊन फुटल्याचा दावा केलाय. न्यूज एजन्सी IANS ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, या घटनेची माहिती अॅपलला देण्यात आली आहे. यानंतर कंपनीने त्या व्यक्तीची स्वाक्षरी कागदपत्रांवर घेण्याचा प्रयत्न केला आणि माहिती सार्वजनिक करण्यास मनाई केली.
AppleInsider च्या रिपोर्टनुसार, युजरने डॉक्युमेंटवर सही करण्यास नकार दिला. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, यूजरने सांगितले होते की, त्याची अॅपल वॉच गरम झाल्याचा अलर्ट देत होती. त्याला वॉच सामान्यपेक्षा जास्त गरम असल्याचे जाणवले. यानंतर त्याला घड्याळच्या मागच्या बाजूला क्रॅक पडल्याचे दिसून आले.
नेमकं काय झालं?यानंतर त्याने तात्काळ अॅपल सपोर्टला माहिती दिली आणि चौकशीची मागणी केली. त्यांच्याशी पुन्हा संपर्क करण्यापूर्वी, अॅपल सपोर्टने त्या व्यक्तीला घड्याळाला हात न लावण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशीही घड्याळ तापत होते. यानंतर डिस्प्लेचा चक्काचूर झाला. यानंतर त्या व्यक्तीने वॉच हातात घेताच, त्यातून कर्कश आवाज आला. यानंतर त्याने घड्याळ खिडकीतून बाहेर फेकले, त्यादरम्यान घड्याळाचा स्फोट झाला.
प्रकरणाची चौकशी करणार या घटनेनंतर त्या व्यक्तीने अॅपलला याबाबत संपूर्ण माहिती दिली. यानंतर कंपनीने प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. लवकरच कंपनीचा माणूनस ती घड्याळ लॅबमध्ये घेऊन जाणार आहे. दरम्यान, याआधीही मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. मात्र, अॅपल वॉचची बॅटरी फुटल्याचे प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे.