Apple च्या गुणवत्तेचे कौतुक नेहमीच होत असते. iPhone, iPad आणि iWatch अश्या सर्व प्रोडक्ट्सच्या निर्मितीमध्ये अॅप्पल कोणतीही तडजोड करत नाही. हार्डवेयर सोबतच उत्कृष्ट सॉफ्टवेयर आणि फीचर्स या प्रोडक्ट्समध्ये दिले जातात. अॅप्पलचे ही स्तुती करण्यामागे कारण म्हणजे समोर आलेली एक बातमी आहे जी अॅप्पलच्या गुणवत्तेचा पुरावा देते. बातमी अशी आहे कि, Apple Watch वापरणाऱ्या एका महिलेला हृदय विकाराचा झटका आला होता, या झटक्याची माहिती अॅप्पल वॉचने वेळेवर दिली. त्यामुळे ती दवाखान्यात गेली आणि तिचा जीव वाचला. (Apple Watch Heart Rate Monitor Saves Michigan Woman Potentially Fatal Heart Attack)
ही घटना यूएसमधील मिशिगन राज्यातील आहे. रिपोर्टनुसार डायाना फिनस्ट्रा नावाची एक महिला Apple Watch बांधून आपले काम करत होती. अचानक तिच्या वॉचने नोटिफिकेशन दिली कि डायानाचा हार्ट रेट वाढत आहे. ही बाब विचित्र होती कारण तिने कोणताही व्यायाम केला नव्हता. तरीही अॅप्पल वॉचमध्ये महिलेचा हृदयाची स्पंदने 169 बीट प्रति मिनट येत होती.
डायानाने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली तेव्हा त्या दोघे वेळ न दवडता दवाखान्यात गेले. दवाखान्यात डॉक्टरांनी ईकेजी काढला तेव्हा समजले कि तिला हृदय विकाराचा झटका आला होता. वाढणारा हार्ट रेट हृदय विकाराचा झटका असल्याची माहिती डायानाला नव्हती. डायानाने Apple Watch चे आभार मानले. ती म्हणाली कि, जर वॉचने वेळेवर सूचना दिली नसती तर ती वेळेवर दवाखान्यात पोहूचू शकली नसती आणि कदाचित तिला जीव देखील गमवावा लागला असता.