Apple Event 2021 च्या मंचावरून iPad 2021, iPhone 13 Series सह Apple Watch Series 7 ग्राहकांच्या भेटीला आली आहे. या वॉच सीरिजमधील सर्वात मोठा बदल म्हणजे ऑलवेज-ऑन रेटिना डिस्प्ले. अॅप्पल वॉच सीरीज 7 मध्ये पूर्णपणे नवीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील बेजल 40 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे डिस्प्लेचा आकार वाढला आहे. नव्या आकारामुळे या वॉचमध्ये जास्त टेक्स्ट आणि फुल QWERTY कीबोर्ड सहज वापरता येतो. त्यामुळे आता वॉचवरून देखील मेसेजसना रिप्लाय देता येईल.
Apple Watch Series 7 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Apple Watch 7 Series ची किंमत 399 डॉलरपासून सुरु होईल. ही किंमत 29,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होईल. कंपनीने वॉच सीरिजमधील जुन्या दोन मॉडेल्सची विक्री अजूनही सुरु ठेवली आहे. यात Apple Watch 3 आणि Apple Watch SE चा समावेश आहे. ज्यांची किंमत क्रमशः 199 यूएस डॉलर (सुमारे 14,700 रुपये) आणि 299 डॉलर (सुमारे 22,000 रुपये) असेल.
Apple वॉच सीरीज 7 IP6X डस्ट रेजिस्टेंससह सादर करण्यात आली आहे. ही सीरिज 18 तासांचा बॅटरी लाईफ देईल, असे कंपनीने सांगितले आहे. जुन्या वॉच सीरीजच्या तुलनेत ही सीरिज USB-C च्या मदतीने 30 टक्के जास्त वेगाने चार्ज करता येईल. यातील watchOS 8 क्विकपाथसह एका फुल कीबोर्डला सपोर्ट करतो. या वॉचमध्ये ईसीजी आणि ब्लड ऑक्सीजन मॉनिटर सारखे फिचर मिळतात.
Apple Watch Series 7 कंपनीची आतापर्यंतची सर्वात मजबूत Apple वॉच असेल, असे कंपनीने म्हटले आहे. नवीन वॉच सीरीजमध्ये नवीन वॉच फेस देण्यात आले आहेत. तसेच वर्कआउट करताना यातील फॉल डिटेक्शन फीचर देखील खूप उपयुक्त ठरू शकते. Apple Watch 7 सीरिज 41mm आणि 45mm अश्या दोन साईजमध्ये सादर करण्यात आली आहे.