प्रिमिअम स्मार्टफोनच्या स्पर्धेत अॅपलच्या आयफोनला चीनच्या वनप्लस कंपनीकडून कडवी टक्कर मिळत आहे. फार कमी कालावधीत वनप्लसने आयफोनला नामोहरम केले आहे. यामुळे अॅपलनेही आता वनप्लसला खिंडीत गाठण्याचे ठरविले आहे.
अॅपलच्य़ा फोनची किंमत ही लाखाच्या आसपास आहे. यामुळे मध्यम वर्ग या फोनकडे वळत नाही. तर वनप्लसची किंमत 50 हजारांच्या आसपास असल्याने याचा थेट फटका आयफोनच्या विक्रीला बसत आहे. वनप्लसचे नवीन फोन 34000 पासून सुरू होतात. तर अॅपलचे नवीन फोन हे 65000 पासून सुरू होतात. किंमतीचा हा जवळपास दुप्पटीचा फरक आहे.
अॅपल iPhone SE चे अपग्रेडेड व्हर्जन घेऊन येणार आहे. या फोनचा पहिला लूकही समोर आला आहे. मात्र, अॅपलकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लीक झालेल्या माहितीनुसार iPhone SE हा स्वस्त फोन असणार आहे. या फोनला 64 जीबी आणि 128 जीबीच्या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये बाजारात उतरविण्यात येणार आहे. याची किंमत 28000 आणि 32000 रुपये असण्याची शक्यता आहे. असे झाले तर हा अॅपलचा पहिला स्वस्त आयफोन असणार आहे.
वनलीक्सने iPhone SE2 चा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोन आयफोन 9 या नावाने लाँच होईल, असा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. या फोटोनुसार या फोनची डिझाईन आयफोन 8 सारखीच आहे, यामध्ये टच आयडीसोबत एलसीडी डिस्प्ले पॅनेलही देण्यात आले आहे.
तर iGeeksBlog च्या दाव्यानुसार अॅपल नवीन आयपॅडही लाँच करणार आहे. ज्यामध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. याशिवाय आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग मिळणार आहे.