Apple ने 10 सप्टेंबरला Apple Arcade ही गेमिंग सेवा सुरू केली आहे. याचसोबत एक्स्लुझिव्ह व्हिडीओ सेवेचीही घोषणा केली आहे. आर्केडमध्ये तब्बल 3 लाख गेम उपलब्ध होणार आहेत. हे गेम अन्य कुठेही मिळणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय आर्केड 150 देशांमध्ये एक महिना मोफत ट्रायल म्हणून दिले जाणार आहे. हा जगातील पहिलाच क्रॉस गेमिंग प्लॅटफॉर्म असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
जगभरात ही सेवा 4.99 डॉलरना मिळणार आहे. शिवाय Apple TV+ ला कंपनीने आधीच घोषित केले होते. मात्र, आता याची लाँचिंग तारीख आणि भारतातील किंमतही समोर आली आहे. व्हिडीओ एन्टरटेन्मेंटमध्ये अॅपल टीव्ही प्लस या तगड्या प्रतिस्पर्ध्याची एन्ट्री होणार असल्याने नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमचे धाबे दणाणणार आहेत.
भारतामध्ये व्हिडीओ सेवांनी खोलवर पाळेमुळे रोवली आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमसह आता फ्लिपकार्टनेही एन्ट्री केली आहे. या सगळ्यांना आता Apple TV+ कडवी टक्कर देणार आहे. मात्र ही सेवा अॅपल युजरना मिळण्यासेबत Amazon Fire TV, काही सॅमसंग आणि सोनी टीव्ही वरही वापरता येणार आहे. याच्या कंटेंटमध्ये The Morning Show देखील असणार आहे. ही सेवाही भारतात 99 रुपये प्रती महिना या दराने मिळणार आहे. भारतातील सर्वात स्वस्त सेवा असल्याचा दावा कंपनीने केला आहे.