Apple च्या पॉलिसीनुसार कंपनी हरवलेले किंवा चोरीला गेलेले डिवाइस रिपेअर करत नाही, जर त्या फोनमध्ये ‘फाईंड माय डिवाइस’ फिचर इनेबल केलेलं असेल. परंतु आता कंपनी GSMA डिवाइस रजिस्ट्रीवर रिपोर्ट करण्यात आलेले आयफोन्स रिपेअर करण्यास नकार देणार आहे, अशी माहिती 9to5mac या वेबसाईटनं दिली आहे.
यासाठी कंपनीनं आपला अॅप्पल स्टोरमधील कर्मचाऱ्यांना आणि अधिकृत सर्व्हिस प्रोव्हायडर्सना मेमो पाठवला आहे. त्यानुसार, कंपनीनं आता जीएसएमए डिवाइस रजिस्ट्रीच्या डाटाबेसचा वापर करणार आहे, तिथे डिवाइस हरवलेला किंवा चोरीला गेला असल्याची नोंद आहे की नाही हे फोन दुरुस्त करण्याआधी बघून घ्यावं. जर कंपनीच्या अंतगर्त सिस्टम ‘हरवलेला फोन’ असं दर्शवत असेल, तर टेक्निशियनने तो फोन दुरुस्त करू नये.
जीएसएमए डिवाइस रजिस्ट्री (GSMA Device Registry) हा एक जागतिक डेटाबेस आहे जिथे स्मार्टफोन मालक हरवलेल्या, चोरीला गेलेल्या किंवा फसवुणकीची माहिती देतात. ज्या कंपन्यांकडे या डेटाबेसचा अॅक्सेस आहे त्या आयएमईआय नंबरच्या मदतीने स्मार्टफोनची स्थिती जाणून घेऊ शकतात.
या नव्या नियमामुळे चोरीला गेलेल्या आयफोन्सच्या बदल्यात नवीन आयफोन दिला जाणार नाही, जर जुना आयफोनमध्ये फाईंड माय डिवाइस बंद असेल तर. ज्या डिवाइसमध्ये हे फिचर इनेबल असेल त्यांच्यावर या नव्या नियमाचा प्रभाव पडणार नाही, असे आयफोन सध्याही कंपनी रिपेअर करत नाही. तसेच जर तुम्ही तुमचा अॅप्पल आयडी अॅक्सेस करू शकत नसाल तर तुम्ही डिवाइसचं बिल देखील पुरावा म्हणून दाखवू शकता.