Apple सध्या एका नव्या हायड्रेशन सेन्सरवर काम करत आहे. या सेन्सरचा वापर अॅप्पल वॉचसारख्या वेयरेबल डिव्हायसेसमध्ये केला जाईल. ही माहिती PatentlyApple ने एका पेटंटच्या आधारावर दिली आहे. हे पेटंट युनाइटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) वर अॅप्पलने “Hydration measurement with a watch” नावाने नोंदवले आहे.
शरीरातील पाण्याचे प्रमाण तपासण्याच्या पारंपरिक पद्धती त्रासदायक, महाग आणि बेभरवशाच्या आहेत, असे अॅप्पलचे म्हणणे आहे. या पद्धती सिंगल फ्लूड टेस्ट सॅंपलच्या माध्यमातून पाण्याचे प्रमाण सांगतात. परंतु कंपनीच्या नव्या पद्धतीमध्ये ही प्रक्रिया वापरली जात नाही. अॅप्पलच्या पेटंटनुसार, कंपनीच्या हायड्रेशन सेन्सरमध्ये नॉन इनवेसिव इलेक्ट्रॉड्स त्वचेवर ठेऊन पाण्याचे प्रमाण सांगितले जाईल. हे देखील वाचा: सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या
ही पद्धत विश्वसनीय आणि सोप्पी आहे, यात युजरच्या घामाचे परीक्षण करण्यात येईल. पेटंटमध्ये सविस्तरपणे या टेक्नॉलॉजीची माहिती देण्यात आली आहे. ही पद्धत सुखकर, अचूक आणि स्वयंचलित आहे. तसेच पेटंटमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आरोग्यसाठी किती लाभदायक असते हे सांगण्यात आले आहे. व्यायामानंतर किंवा मोठ्या प्रमाणावरील शारीरिक हालचालीनंतर शरीरातील पाण्याचा स्थर जाणून घेणे उपयुक्त ठरू शकते. याआधी देखील अश्या अनेक पेटंटची माहिती समोर आली आहे, परंतु सर्वच पेटंटेड फीचर्स व्यवसायिकरित्या उपलब्ध होत नाहीत. हे देखील वाचा: iPhone 13 मध्ये मिळणार DSLR सारखा व्हिडीओ पोट्रेट मोड; नवीन कॅमेरा फीचर्स झाले लीक