न्युयॉर्क : प्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलचा दरवर्षी साजरा केला जाणारा लाँचिंग इव्हेंट यंदाही 12 सप्टेंबरलाच होणार आहे. या कार्यक्रमासाठी कंपनीने मिडियाला निमंत्रण पाठविण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाचे नाव 'Gather Round' असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये अॅपल तीन नव्या आयफोन्ससह इतरही उत्पादने लाँच करणार आहे.
अॅपलच्या Gather Round इव्हेंटमध्ये तीन नवे आयफोन लाँच होण्याची शक्यता आहे. तरीही कंपनीने याबाबत कोणतीही कल्पना दिलेली नाही. मात्र, आयफोन 9, iPhone XS आणि iPhone XS Plus या नावाने अॅपल नवे फोन आणू शकते. iPhone 9 मध्ये 6.1 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल. तर iPhone XS आणि iPhone XS Plus मध्ये 5.8 आणि 6.5 ओएलईडी जिस्प्ले असणार आहे.
दरम्यान, आयफोन एक्सएस चे फोटो लाँच होण्यापूर्वीच एका वेबसाईटने लीक केले आहेत. 9to5Mac ने आपल्या रिपोर्टमध्ये दोन्ही फोनचे फोटो लीक केल्याचा दावा केला आहे. दोन्ही मॉडेल सोनेरी रंगातही उपलब्ध होणार आहेत. मागील वर्षी आयफोन एक्स गोल्डन कलरमध्ये आला नव्हता.