नवी दिल्ली - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. स्मार्टफोनमध्ये अनेक जण थर्ड पार्टी अॅपचा वापर करतात. ES File Explorer हे एक फाईल मॅनेजमेंट अॅप असून आतापर्यंत 500 मिलियनवेळा ते डाऊनलोड करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने युजर्सना स्मार्टफोनमधील फाईल्स, डेटा आणि डॉक्यूमेंट्स मॅनेज करता येतात. मात्र फ्रेंच सिक्योरिटी रिसर्चर Robert Baptiste ने ES File Explorer हे हॅक केलं जाऊ शकतं असा दावा केला आहे. या अॅपकडे एक हिडेन वेब सर्व्हर ज्यामुळे युजर्सची महत्त्वाचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे.
ES File Explorer हे अॅप ओपन केल्यानंतर जर दुसरी कोणती व्यक्ती तुमच्या नेटवर्कशी कनेक्ट असेल तर ती व्यक्ती तुमच्या स्मार्टफोनमधील फाईल आणि इतर गोष्टी रिमोटली अॅक्सेस करते. Robert Baptiste ने याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये स्मार्टफोनमधील डेटा कसाप्रकरे हॅक केला जातो हे दाखवण्यात आले आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.