ZTE नं जागतिक बाजारात आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये दोन नव्या हँडसेटची भर टाकली आहे. हे दोन्ही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन कंपनीनं आपल्या ब्लेड सीरीजमध्ये सादर केले आहेत. ZTE Blade A72 आणि ZTE Blade A52 हे दोन हँडसेट मलेशियन बाजारात आले आहेत. फोन्समध्ये Fusion RAM आणि 6,000mAh Battery ची बॅटरी असे दमदार फिचर मिळतात.
ZTE Blade A72
झेडटीई ब्लेड ए72 स्मार्टफोनमध्ये 6.75 इंचाचा एचडी+ डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा अँड्रॉइड 11 फोन Unisoc SC9863A चिपसेटसह येतो. Fusion RAM टेक्नॉलॉजीमुळे यातील 3 जीबी रॅम मध्ये 2जीबी अतिरिक्त रॅमची भर टाकता येते. पावर बॅकअपसाठी ZTE Blade A72 स्मार्टफोनमध्ये 22.5W फास्ट चार्जिंगसह 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह साईड फिंगरप्रिंटची सुरक्षा देण्यात आली आहे.
ZTE Blade A52
झेडटीई ब्लेड ए52 मध्ये छोटा 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळतो. हा अँड्रॉइड 11 डिवाइस ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc SC9863A चिपसेटवर चालतो. हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह बाजारात आला आहे. मागे असलेल्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही मिळतो. पावर बॅकअपसाठी झेडटीई ब्लेड ए52 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
ZTE Blade ची किंमत
ZTE Blade A72 स्मार्टफोन Space Gray आणि Sky Blue कलरमध्ये MYR 499 म्हणजे 8,900 रुपयांच्या आसपास लाँच करण्यात आला आहे. तर ZTE Blade A52 स्मार्टफोनची किंमत MYR 399 म्हणजे जवळपास 7,100 रुपये आहे, जो Silk Gold आणि Space Grey कलरमध्ये विकत घेता येईल.