Asus Chromebook CX1101 भारतात लाँच करण्यात आला आहे. हा एक बजेट क्रोमबुक आहे, जो फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. या लॅपटॉपमध्ये MIL-STD 810H सर्टिफाइड मिल्ट्री ग्रेड मजबूत डिजाईन देण्यात आली आहे. कंपनीनं यात ड्युअल-कोर Intel Celeron N4020 प्रोसेसर दिला आहे. यातील 42Whr ची बॅटरी 13 तासांचा बॅटरी बॅकअप देईल.
Asus Chromebook CX1101 चे स्पेसिफिकेशन्स
कंपनीनं Chromebook CX1101 मध्ये rugged design दिली आहे. यातील मेटल हिन्जच्या मदतीनं हा लॅपटॉप 180 डिग्री अँगल पर्यंत फिरवता येतो. या क्रोमबुकमध्ये एक स्पिल रेजिस्टन्स कीबोर्ड देण्यात आला आहे. हा डिवाइस US MIL-STD 810H सर्टिफिकेटसह बाजारात आला आहे. तसेच यात गुगलची Titan C सिक्यूरिटी चिप मिळते.
Asus Chromebook CX1101 मध्ये 11.6-इंचाचा HD अँटी-ग्लेयर LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1336 x 786 पिक्सल रिजोल्यूशन आणि 45% NTSC कलर गमुटला सपोर्ट करतो. या डिवाइसमध्ये ड्युअल-कोर Intel Celeron N4020 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4GB LPDDR4 RAM आणि 64GB eMMC स्टोरेज मिळते. हा लॅपटॉप Google च्या ChromeOS वर चालतो.
यातील 3-cell 42Whr बॅटरी सिंगल चार्जमध्ये 13 तासांचा बॅकअप देते. ही बॅटरी USB-C पोर्ट द्वारे 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या डिवाइसमध्ये दोन USB 3.2 Type-C पोर्ट, दोन USB 3.2 Type-A पोर्ट्स, एक microSD कार्ड रीडर आणि एक 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे. या डिवाइसचे वजन 1.24kg आहे.
Asus Chromebook CX1101 ची किंमत
Asus Chromebook CX1101 ची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा आसूसचा लॅपटॉप फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतर्गत मात्र हा लॅपटॉप 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या लॅपटॉपचा पहिला सेल 15 डिसेंबरला सुरु होईल आणि लाँच ऑफर 21 डिसेंबर पर्यंत सुरु राहील.