Asus ने Asus Chromebook Detachable CM3 लाँच केला आहे. या क्रोमबुकमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक 8183 प्रोसेसर आहे. यूएसमध्ये Asus website वर हा डिवाइस को लिस्ट करण्यात आला आहे. भारतात हा कधी लाँच होईल याची माहिती कंपनीने दिलेली नाही.
Asus Chromebook Detachable CM3 ची किंमत
Asus Chromebook Detachable CM3 मध्ये ChromeOS देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील छोट्या व्हेरिएंटची किंमत क्रमश: $349.99 (जवळपास 25,500 रुपये) आणि $369.99 (जवळपास 27,000 हजार रुपये) आहे.
Asus Chromebook Detachable CM3 चे स्पेसिफिकेशन्स
Asus Chromebook Detachable CM3 मध्ये 10.5 इंचाचा LCD डिस्प्ले आहे ज्याचा अस्पेक्ट रेश्यो 16:10 आहे आणि रिजोल्यूशन 1,920X1,200 पिक्सल आहे. या लॅपटॉपमध्ये यात स्टायलस सपोर्ट देण्यात आला आहे. या क्रोमबुकमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक 8183 प्रोसेसर आणि Arm Mali-G72 MP3 जीपीयू देण्यात आला आहे. या क्रॉमबुकमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी eMMC ऑनबोर्ड स्टोरेज आहे. यात डिटॅचेबल कीबोर्ड (काढता येणारा) आहे, जो केस/कवर प्रमाणे देखील वापरता येतो.
हा लॅपटॉप पोट्रेट आणि लँडस्केप अश्या दोन्ही मोडमध्ये वापरता येतो. क्रोमबुकच्या मागे 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि पुढे 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी यात 3.5mm ऑडियो जॅक आणि एक यूएसबी 2.0 टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. या Chromebook मध्ये 27Whr 2-cell Li-ion बॅटरी आहे.