ASUS आपले दोन गेमिंग स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घालणारे ASUS ROG Phone 5S आणि ASUS ROG Phone 5s Pro भारतात येणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. येत्या 15 फेब्रुवारीला ऑनलाईन लाँच इव्हेंटमधून हे फोन भारतीयांच्या भेटीला येतील. हे फोन 18GB RAM, 512GB Storage, Snapdragon 888+ चिपसेट आणि 6,000mAh Battery च्या पावरसह भारतीयांच्या भेटीला येतील.
ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro चे स्पेसिफिकेशन्स
ASUS ROG Phone 5s मध्ये कंपनीने 20.4:9 अस्पेक्ट रेशियो, 2448 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.78-इंसाह्चा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनच्या प्रो मॉडेलमध्ये ROG Vision Color PMOLED डिस्प्ले दिला आहे. दोन्ही फोन्स इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतात. या फोन्सच्या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.
प्रोसेसिंगसाठी ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro मध्ये सर्व लेटेस्ट आणि वेगवान स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. ज्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 888+ प्रोसेसर आणि एड्रेनो 660 जीपीयूचा समावेश आहे. त्याचबरोबर वेगवान LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित आरओजी युआयवर चालतो, जो गेमिंग सेंट्रिक यूआय आहे.
ASUS ROG Phone 5S च्या दोन्ही मॉडेल्समध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सल Sony IMX686 सेन्सर, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. या गेमिंग फोन्समध्ये कंपनीने 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोन्समधील 6,000एमएएचची दमदार बॅटरी 65W HyperCharge फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
हे देखील वाचा: