शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
3
Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा
4
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
5
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
6
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
7
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
8
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
9
बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)
10
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
11
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
12
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
13
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
14
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
15
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
17
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
20
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत

18GB रॅम, 6,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरसह दमदार ASUS ROG Phone 5S लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: August 17, 2021 11:46 AM

तैवानी कंपनी आसूसने सध्या आपल्या गेमिंग आणि हायएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे कंपनीने आपले ...

ठळक मुद्देASUS ROG Phone 5s स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.प्रोसेसिंगसाठी ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro मध्ये सर्व लेटेस्ट आणि वेगवान स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. या फोन्समधील 6,000एमएएचची दमदार बॅटरी 65W HyperCharge फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

तैवानी कंपनी आसूसने सध्या आपल्या गेमिंग आणि हायएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे कंपनीने आपले दोन नवीन गेमिंग स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. टेक कंपनी ASUS ने ROG Phone 5 नंतर आपल्या गेमिंग फोन लाईनअपमध्ये ASUS ROG Phone 5S आणि ASUS ROG Phone 5s Pro नावाच्या दोन स्मार्टफोन्सचा समावेश केला आहे. हे दोन्ही फोन सध्या तैवानमध्ये लाँच झाले आहेत. या फोन्समध्ये 18GB रॅम, 512GB स्टोरेज, Snapdragon 888+ चिपसेट आणि 6,000mAh बॅटरी असे जबरदस्त स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत.  

ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro चे स्पेसिफिकेशन्स 

ASUS ROG Phone 5s मध्ये कंपनीने 20.4:9 अस्पेक्ट रेशियो, 2448 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.78-इंसाह्चा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनच्या प्रो मॉडेलमध्ये ROG Vision Color PMOLED डिस्प्ले दिला आहे. दोन्ही फोन्स इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतात. या फोन्सच्या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा: जबरदस्त! या स्मार्टफोनवर टिकणार नाही बॅक्टेरिया; अँटी-बॅक्टेरियल कोटिंगसह Ulefone Armor 12 Dual 5G लाँच

प्रोसेसिंगसाठी ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro मध्ये सर्व लेटेस्ट आणि वेगवान स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. ज्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 888+ प्रोसेसर आणि एड्रेनो 660 जीपीयूचा समावेश आहे. त्याचबरोबर वेगवान LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित आरओजी युआयवर चालतो, जो गेमिंग सेंट्रिक यूआय आहे.  

ASUS ROG Phone 5S च्या दोन्ही मॉडेल्समध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सल Sony IMX686 सेन्सर, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. या गेमिंग फोन्समध्ये कंपनीने 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोन्समधील 6,000एमएएचची दमदार बॅटरी 65W HyperCharge फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

हे देखील वाचा: रियलमीने बंद केली भारतातील ही फ्लॅगशिप सीरिज; नवीन स्मार्टफोन होणार नाहीत लाँच

ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro ची किंमत 

ASUS ROG Phone 5s स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या फोनचा 16GBरॅम आणि 256GB मॉडेल NT$ 29,990 म्हणजे जवळपास 79,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर फोनचा 18GB रॅम आणि 512GB असलेला मोठा मॉडेल NT$ 33,990 म्हणजे जवळपास 90,000 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे.  

ASUS ROG Phone 5s Pro मॉडेलचा फक्त एकमेव व्हेरिएंट कंपनीने सादर केला आहे. या फोनमध्ये 18GB रॅम + 512GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत NT$ 37,990 ठेवण्यात आली आहे. ही किंमत जवळपास 1 लाख रुपयांमध्ये रूपांतरित होते. हे दोन्ही फोन्स भारतासह जागतिक बाजारात कधी उपलब्ध होतील याची माहिती कंपनीने दिलेली नाही.  

टॅग्स :Asus Phoneअसूस मोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड