हल्ली बाजारात विविध कंपनींचे नवनवीन स्मार्टफोन सतत येत असतात. स्मार्टफोन खरेदी करताना युजर्स फोनच्या बिल्ट-क्वालिटीकडे खासकरून लक्ष देतात. स्वस्त फोनकडून खराब बिल्ड गुणवत्तेची अपेक्षा करू शकता. परंतु, महाग फोनकडून अजिबातच नाही. उच्च दर्जाची मेटल फ्रेम, गोरिला ग्लास प्रोटेक्शन सारख्या इतरच अनेक गोष्टी आधुनिक स्मार्टफोन मजबूत आणि टिकाऊ असल्याचा दावा करतात. पण, ते तितके टिकाऊ आणि मजबूत असतात का? याचं उत्तर एका व्हिडिओतून समोर आलं आहे.
सध्या एक व्हि़डीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये Asus चा एक महागडा फोन एखाद्या बिस्किटासारखा दोन भागांत तुटला आहे. या व्हि़डीओ पाहन सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हा आसूस चा ROG Phone 6 Pro फोन आहे. एका यूट्यूबरने फोनची बेंड टेस्ट केली असता, त्यामध्ये फोन सहजपणे दोन भागांमध्ये तुटतो. यूट्यूब चॅनेल जेरी रिग एव्हरीथिंगचे बेंड टेस्ट एक्स्पर्ट जॅक यांनी पांढर्या रंगाच्या ROG फोन 6 प्रो वर त्यांची सिग्नेचर स्ट्रेस टेस्ट केली. सुरुवातीला सर्व काही ठीक आहे असे वाटले.
पहिल्याच प्रयत्नात तुटला फोन
आरओजी फोन 6 मध्ये डिस्प्लेसाठी गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेकेशन आहे. स्क्रॅच चाचणीमध्ये, फोनने स्तर 7 वर आणि स्तर 6 वर स्क्रॅच दिसले. बेंड टेस्ट सुरू होईपर्यंत फोनची ताकद पुरेशी होती. बेंड टेस्टमध्ये ROG Phone 6 अयशस्वी झाला. तेही पहिल्याच प्रयत्नात. ROG फोन 6 सहजपणे तुटतो. म्हणजेच फ्रेम मधोमध तुटते आणि गोरिला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन असूनही, फोन दोन भागात विभागला जातो आणि फोनच्या मागील पॅनेलचं वाईटरित्या नुकसान होतं.
फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन
ROG Phone 6 Pro मध्ये वेंट्ससह एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, जे एक्सट्रीम परफॉर्मन्स प्रदान करण्यात मदत करते. अनेकदा, बहुतेक स्मार्टफोन्सना रियल वर्ल्डमध्ये असे एक्सट्रीम स्ट्रेस टेस्ट द्यावी लागत नाही. ROG Phone 6 Pro स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपवर आधारित आहे. फोनमध्ये 6000 mAh बॅटरी, 10-बिट पॅनेलसह 6.7 इंच 165Hz AMOLED डिस्प्ले, मागील बाजूला सेकंडरी OLED डिस्प्ले, 65 W वायर्ड चार्जिंग, 50 MP मुख्य कॅमेरा, ड्युअल USB-C पोर्ट आणि एक स्टिरिओ लाउडस्पीकर पॅक आहे. Asus ने जुलैमध्ये त्यांची नवीन Asus ROG Phone 6 सीरीज लाँच केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"