आसूसने VivoBook 15 OLED हा आपला नवीन लॅपटॉप भारतात सादर केला आहे. या लॅपटॉपमध्ये Intel Core i3, Core i5, Core i7 आणि AMD Ryzen 5 प्रोसेसरचे पर्याय मिळतात. तसेच 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत M.2 NVMe SSD किंवा ऑनबोर्ड स्टोरेजसाठी 1TB पर्यंत SATA HDD देखील घेता येईल. चला जाणून घेऊया या लॅपटॉपची किंमत आणि स्पेसीफाकेशन्स.
Asus Vivobook 15 OLED ची किंमत
Asus Vivobook 15 OLED च्या Core i3 व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच, 16GB RAM असलेला Vivobook 15 Core i5 लॅपटॉप 68,990 रुपये आणि 8GB RAM व्हेरिएंट 65,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Vivobook 15 चा Core i7 व्हेरिएंट 81,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच Vivobook 15 AMD व्हर्जनसाठी 62,990 रुपये मोजावे लागतील. हा लॅपटॉप ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोर्समधून विकत घेता येईल.
Asus Vivobook 15 OLED चे स्पेसिफिकेशन्स
Asus Vivobook 15 OLED मध्ये 15.6 इंचाचा Full-HD OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1920×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 16:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. लॅपटॉपचे 8GB RAM आणि 16GB RAM असे दोन व्हर्जन बाजारात उपलब्ध होतील. तसेच यात Intel Core i3-1115G4, Intel Core i5-1135G7, Intel Core i7-1165G7 आणि AMD Ryzen 5 5500U अशा प्रोसेसरचा पर्याय मिळेल.
कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये ड्युअल बँड Wi-Fi 6 (802.11ax), Bluetooth v5, दोन USB 2.0 पोर्ट, USB Type-C 3.2 Gen 1 पोर्ट, USB Type-A 3.2 Gen 1 पोर्ट, HDMI 1.4 जॅक, 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय मिळतात. हा एका Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार लॅपटॉप आहे, जो लवकरच Windows 11 वर अपडेट करता येईल Vivobook 15 OLED मध्ये 42Whr बॅटरी आहे आणि याचे वजन 1.8 किलोग्राम आहे.