असुसने आपल्या झेनफोन मॅक्स प्रो एम १ या मॉडेलला नवीन आवृत्तीच्या स्वरूपात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे फिचर्स व मूल्य जाहीर करण्यात आले आहे.
झेनफोन मॅक्स प्रो एम १ हे मॉडेल ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज या दोन पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला होता. आता या स्मार्टफोनची वाढीव ६ जीबी रॅम असणारी आवृत्ती लाँच करण्याचे संकेत मिळाले आहेत. याचे मूल्य १४,९९९ रूपये असेल असे कंपनीने जाहीर केले आहे. यामध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. झेनफोन मॅक्स प्रो (एम१) हा स्मार्टफोन ५.९९ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. या मॉडेलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या अंतर्गत एफ/२.२ अपार्चर, पीडीएएफ, ५ एलीमेंट लेन्स, ८० अंशातील अँगल व्ह्यू असणार्या लेन्सने युक्त असणारा १३ मेगापिक्सल्सचा एक कॅमेरा आहे. तर यातील दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यात बोके इफेक्ट देण्याची सुविधा आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा हा एफ/२.० अपार्चर, ८५.५ अंशाचा अँगल व्ह्यू आदींनी सज्ज आहे.
यामध्ये तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये पॅसीव्ह मॅक्स-बॉक्स अँम्प्लीफायर दिलेले असून यामुळे अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.