नवी दिल्ली - WhatsApp वर दिवसभरात असंख्य मेसेज येत असतात. अनेक मेसेज हे झटपट तुफान व्हायरल होतात. पण Whatsapp वरची एक चूक महागात पडू शकते. यामुळे थेट तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. तुम्ही जर WhatsApp च्या कोणत्याही ग्रुपचे अॅडमिन असाल किंवा तुम्ही मेंबर म्हणून कोणताही मेसेज फॉरवर्ड करीत असाल तर आताच अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण हे तुमच्यासाठी धोकादायक असून यामुळे थेट जेलमध्ये रवानगी केली जाऊ शकते. देशात असे अनेक प्रकरणे समोर आले आहेत की, ज्यामुळे अनेकांना जेलची हवा खावी लागली आहे. अलर्ट राहणं गरजेचं असून याबाबत अधिक जाणून घेऊया...
जर तुम्ही एखाद्या ग्रुपचे अॅडमिन असाल किंवा ग्रुपमधील मेंबरने ग्रुपवर शेअर केलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही फॉरवर्ड करीत असाल तर एकदा ही माहिती वाचून घ्या. ही माहिती खरी आहे की खोटी आहे. याची एकदा पडताळणी करून घ्या. जर ती माहिती लोकांच्या हिताची वाटत असेल तरच ती अन्य सदस्याला फॉरवर्ड करा. अन्यथा असे करू नका. चुकीची माहिती, समाजात द्वेष पसरवणारी माहिती, अश्लील माहिती शेअर करणाऱ्यांवर आयटी सेलचे बारीक लक्ष आहे. या संबंधी कुणी जर तक्रार केली तर तुम्ही चांगलेच अडचणीत येऊ शकतात. तुम्हाला गुन्ह्याखाली अटक होऊ शकते. तसेच जेलमध्येही जाऊ शकता.
द्वेष पसरवणाऱ्या बातम्या किंवा मजकूर फॉरवर्ड करू नका
जर तुम्ही आपत्तीजनक मेसेज फॉरवर्ड करत असाल तर तुमची जेलमध्ये रवानगी होऊ शकते. जे मेसेज चुकीचे आहेत, पूर्णपणे आधारहीन आहेत. जनतेत संभ्रम पसरवणारे आहेत, असे मेसेज चुकूनही फॉरवर्ड करू नका. असे मेसेज तुम्हाला अडचणीत आणू शकतात. त्यामुळे वेळीच अलर्ट राहा. चांगल्या बातम्या वाचा व शेअर करा. कुणाच्याही अर्थवट माहिती असणाऱ्या, अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या, कुणाचेही हनन करणाऱ्या किंवा द्वेष पसरवणाऱ्या बातम्या किंवा मजकूर फॉरवर्ड करू नका. असे कुणी करीत असेल तर त्याला वेळीच रोखा, ग्रुपमधून काढून टाका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
WhatsApp वर लपवू शकता तुम्ही तुमचं नाव; 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल गायब
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना प्रोफाईल नेम ठेवण्याची संधी देतं. अनेकदा काही लोक आपली ओळख लपवण्यासाठी तिथे चुकीचं नाव अथवा एखादं चिन्ह टाकतात. पण असं करण्याची गरज नाही कारण तुम्ही invisible Text पाठवण्यासोबतच तुमची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे नाव इनविजिबल टेक्स्टसह बदलू शकता. WhatsApp वर तुमचे नाव इनविजिबल ठेवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल आणि PC वर Whatsapp उघडा. त्यानंतर ही दोन चिन्हे कॉपी करा. Symbols: ⇨ . WhatsApp मधील Settings या पर्यायावर जा. तुमच्या सध्याच्या WhatsApp नावावर आणि नंतर पेन्सिल चिन्हावर टॅप करा. आता बाण चिन्ह (⇨) काढून टाका आणि तुमचे नाव बदलण्यासाठी ओके वर टॅप करा. WhatsApp वर तुमचे नाव इनविजिबल होईल.