शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
4
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
5
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
6
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
7
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणलं; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचा लाड?
8
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
9
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
10
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
11
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
12
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
13
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
14
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
15
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
16
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
17
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
18
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
19
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
20
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

पाच वर्षांनंतर 36 चायनीज ॲप्सची भारतात रि-एन्ट्री; गुगल अन् ॲपल स्टोअरवर उपलब्ध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 22:09 IST

Banned Chinese Apps: भारत सरकारने 2020 मध्ये 200 पेक्षा जास्त चीनी अॅप्सवर बंदी घातली होती.

Banned Chinese Apps: केंद्र सरकारने 2020 मध्ये TikTok सह 200 हून अधिक चीनी ॲप्सवर बंदी घातली होती. पण, आता यापैकी 36 ॲप्स पुन्हा भारतात सुरू झाले आहेत. यामध्ये लोकप्रिय शेअरिंग ॲप Xender देखील सामील आहे. हे ॲप्स Google Play Store आणि Apple Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. यातील काही ॲप्स थोड्या बदलांसह परत आले आहेत, जसे की त्यांची ब्रँड नावे किंवा मालक बदलले आहेत. इतर काही ॲप्सने भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. पण, अद्याप 2020 मध्ये बंदी घातलेला लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ ॲप TikTok परत आला नाही.

अनेक अॅप्सची नावे बदललीभारतात परत आलेल्या 36 चीनी ॲप्समध्ये Xender, MangoTV, Youku, Taobao आणि डेटिंग ॲप Tantan चा समावेश आहे. Apple च्या App Store वर "Xender: File Share, Share Music" नावाने हे अॅप परत आले आहे. मात्र, सध्या ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. याशिवाय डेटिंग ॲपने त्याचे नाव बदलून "TanTan - Asian Dating App" असे केले आहे. 

ही ॲप्स नावे न बदलता परत आलीकाही ॲप्सनी त्यांच्या ब्रँड आणि मालकाच्या माहितीमध्ये थोडासा बदल केला आहे, तर काहींनी भारतीय कंपन्यांशी करार करून कायदेशीररित्या काम करण्याचा मार्ग शोधला आहे. चायनीज स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म MangoTV कोणत्याही बदलाशिवाय पुन्हा लाइव्ह झाले आहे. त्याचे नाव किंवा ओळख बदललेली नाही. याशिवाय चीनची एक मोठी व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा युकू, जी अनेकदा यूट्यूबसारखी मानली जाते, ती देखील परत आली आहे.

Pub G देखील परत आले, रिलायन्ससोबत भागीदारी फॅशन शॉपिंग ॲप शेरीनने रिलायन्ससोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे त्यांचा डेटा फक्त भारतातच राहील. 2020 मध्ये बंदी घातलेला PUBG मोबाइल, दक्षिण कोरियाच्या क्राफ्टन कंपनीच्या अंतर्गत बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) म्हणून परत आला. पण, BGMI वर 2022 मध्ये पुन्हा बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर भारताच्या सुरक्षा नियमांची पूर्तता केल्यानंतर 2023 मध्ये अॅफ पुन्हा सुरू करण्यात आले.

टॅग्स :chinaचीनtechnologyतंत्रज्ञानIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार